टोपेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोणीकरांविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक

(Ncp Filed Complaint Aginst Bjp Mla Lonikar In Jalna) जालना शहरातील तालुका जालना पोलिसांत राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
टोपेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोणीकरांविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक
Rajesh Tope-Babanrao LonikarSarkarnama

जालना ः शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन झाले, परंतु या दरम्यान, लोणीकरांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

लोणीकरांच्या या विधानाबद्दल आता राष्ट्रवादी काॅंग्रेस चांगली आक्रमक झाली असून लोणीकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात काल थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीजबिल वसुली थांबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी लोणीकरांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर असा वादग्रस्त उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतांना केला होता. दरम्यान आता लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

लोणीकरांचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. .याशिवाय जालना शहरातील तालुका जालना पोलिसांत राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देतांना लोणीकर यांनी पालमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल वापरलेले शब्द हे असंस्कृत आणि राज्याच्या परंपरेला न शोभणारे असल्याचे म्हणत आम्ही त्यांच्या या विधानाचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

Rajesh Tope-Babanrao Lonikar
शेतकरी आंदोलनातील बळींना जबाबदार पंतप्रधान मोदी, कृषीमंत्र्यावर गुन्हे दाखल करा

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in