राष्ट्रवादी नेहमीच आम्हाला आडवी गेली ; नामांतर विरोधातील याचिकेवरून शिंदे गट आक्रमक

औरंगाबादचे छत्रपती संभाजीगर व उस्मानाबादे धाराशीव नामांतर करण्याचा ठरावर शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने मंजुर केला होता. (Mla Sanjay Shirsat)
Mla Sanjay shirsat-Uddhav Thackeray News
Mla Sanjay shirsat-Uddhav Thackeray NewsSarkarnama

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस आणि त्यापुर्वी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावात बदल करत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असा करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. आता या निर्णयाच्या विरोधात (Aurangabad) औरंगाबाद येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व नामांतर विरोधी कृती समितीच्यावतीने मुश्ताक अहेमद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

नामांतराच्या प्रस्तावाला विरोध करणाची याचिका दाखल झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. (Ncp) राष्ट्रवादी नेहमी आम्हाला आडवी जात आली आहे, हेच आम्ही वारंवार उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी कायम शिवसेना विरोधी राहिली आहे, हेच नामांतर विरोधी याचिकेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशा शब्दात शिरसाट (Snajay Shirsat) यांनी टीका केली.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीगर व उस्मानाबादे धाराशीव नामांतर करण्याचा ठरावर शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने मंजुर केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मंजुर करून घेतला होता.

परंतु अल्पमतात असलेल्या आणि राज्यपालांनी विश्वामत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे आघाडी सरकारने तेव्हा घेतलेला ठरवा वैध ठरत नाही, असा दावा करत नव्याने हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता.

परंतु या नामांतराच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मुश्ताक अहेमद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. परंतु या याचिकेनंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे.

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून पुन्हा राष्ट्रवादीकडे उंगलीनिर्देश केला आहे. राष्ट्रवादी कायम शिवसेना व उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या आड आल्याचा उल्लेख शिरसाट यांनी केला.

Mla Sanjay shirsat-Uddhav Thackeray News
Omraje Nimblkar : मरेपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही..

ठाकरे यांनी प्रस्ताव मंजुर केल्यानंतर राष्ट्रवादीने सभागृहाबाहेर नामांतरविरोधी भूमिका घेतली होती. शरद पवार यांनी देखील या निर्णयाची आम्हाला माहिती नव्हती म्हणत अंग झटकले होते. आता त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकांना नामांतराच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याची संधी साधत शिरसाट यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा विषया मार्गी लावतील, अशी आशा व्यक्त करतांनाच न्यालायलीन लढा आम्ही नेटाने लढू असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in