Nanded : सत्तावीस हजार निष्ठावंत शिवसैनिक लिहून देणार शपथपत्र..

बंडखोरीचे हे ग्रहण जिल्हाभरात पसरू नये, याची काळजी शिवसेनेचे नेते घेतांना दिसत आहेत. (Nanded Shivsena)
Shivsena Nanded News
Shivsena Nanded NewsSarkarnama

नांदेड : राज्यात सध्या निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध बंडखोर असा संघर्ष सुरू आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आम्ही तुमच्यासोबतच आहोत यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून दिले जात आहे. आता (Nanded) नांदेड जिल्ह्यातून तब्बल २७ हजार शिवसैनिक निष्ठावंत असल्याचे शपथपत्र लिहून देणार आहेत. शिवसैनिकांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला.

नांदेडमध्ये आज निष्ठावंत सैनिकांची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघातून प्रत्येकी तीन हजार शिवसैनिकांचे असे एकूण २७ हजार शपथपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. (Marathwada) यावेळी नविन सदस्य नोंदणी मोहीम जोरात करण्याचा संकल्प करत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात मजबूत करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.

गद्दारांकडून शिवसैनिकांना त्रास दिला जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देखील नांदेड जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी दिला. बैठकीस मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर सहभागी झाले. त्यानंतर जिल्ह्यात शिवसैनिकांचा रोष वाढला आहे.

Shivsena Nanded News
ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद अन् मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये ; औरंगाबाद, नाशिकला येणार..

बंडखोरीचे हे ग्रहण जिल्हाभरात पसरू नये, याची काळजी शिवसेनेचे नेते घेतांना दिसत आहेत. माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यात गद्दारांना गावबंदी केली जाईल, त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर आता निष्ठावंत शिवसैनिकांची मोट बांधत जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in