Nanded : संजय बियाणींच्या पत्नीचे दिरावर चोरीचे गंभीर आरोप ; गुन्हा दाखल..

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्रविण बियाणी विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Nanded Crime)
Builder Shot Dead in Nanded
Builder Shot Dead in NandedSarkarnama

नांदेड : शहरातील प्रसिद्ध तरूण बिल्डर संजय बियाणी यांची दोन महिन्यापुर्वी भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आली होती. (Nanded) घरासमोरच मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी अगदी जवळून बियाणी यांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणाने संपुर्ण जिल्हा हादरून गेला होता. (Crime) पोलिसांनी तब्बल ५६ दिवस सात राज्यात तपास करून ८ ते १० आरोपींना नुकतीच अटक केली होती. पोलिस हत्येच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न करत असतांनाच आता या हत्येला गृह कलहाची किनार आहे की काय ? अशी शंका उपस्थीत केली जात आहे.

संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या दिरावर आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, हिशेब असलेल्या हार्ड डिस्क चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे.(Marathwada) या प्रकरणी पोलसिांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. आता या नव्या आरोपातून बियाणी हत्येत कोणाता धागा सापडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटूंबात गृहकलह सुरु झाल्याचे त्यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांवरून दिसत आहे.

संजय बियाणी यांच्या पत्नीने दिर प्रविण बालाप्रसाद बियाणी यांनी राज माॅलमधील कार्यालयातून फायनान्सच्या आर्थिक देवाणघेवाणीचा डाटा असलेला १ टीबी डाटा चोरुन नेल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्रविण बियाणी विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Builder Shot Dead in Nanded
तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या

संजय बियाणी यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा असल्याचे समजते. पोलिसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली आहे, बियाणी यांच्या खुनाचे रहस्य उलगडत असतानाच बियाणींच्या कुटूंबात गृहकलह सुरू झाल्याचे यावरून स्पष्ट होते. प्रविण बियाणी यांना छातीत दुखत असल्याने कालच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com