Nanded : सत्तारांनी घेतली चव्हाणांची भेट ; म्हणाले सगळं काही ओक्के..

सत्तार कुठेही असले तरी आमचे मैत्रीचे संबंध कायम आहेत. शंकरराव चव्हाण असतांना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय पक्ष वेगळे असले तरी आमची मैत्री खूप जुनी आहे. (Ashok Chavan)
Minister Abdul Sattar and Ashok Chavan Meet in Nanded News
Minister Abdul Sattar and Ashok Chavan Meet in Nanded NewsSarkarnama

नांदेड : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या नांदेड दौऱ्यात आज माजीमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील हे दोघे मंत्री होते. (Ashok Chavan) चव्हाण सार्वजनिक बांधकाम तर सत्तार हे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि (Abdul Sattar) अब्दुल सत्तार कृषीमंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर सत्तारांचा पहिलाच नांदेड दौरा होता.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर सत्तारांनी थेट अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी धडक दिली. (Nanded) यावेळी चव्हाण आणि सत्तार यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा देखील झाल्याचे बोलले जाते. चहापान आणि चर्चा झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना आमचे जुने वैयक्तिक संबंध आहेत. आज ते कोणत्या पक्षात आहेत याचा भेटीशी संबंध नाही.

वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध असतात आणि ते असले पाहिजेत. आमच्यात सगळं काही ओक्के आहे, असे म्हणत दोघांनीही या भेटीचे समर्थन केले. सत्तार यांनी अशोक चव्हाण हे आपले राजकीय गुरू असल्याचे सांगत माझे आणि त्यांचे संबंध चांगले नसते तर मी त्यांना भेटायला आलो असतो का? असा सवाल केला.

अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये कृषी विभागाची बैठक घेतली. बैठकीनंतर ते अशोक चव्हाणांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले होते. प्रसार माध्यमांना या भेटीबद्दल सांगतांना सत्तार म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीत स्व. शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी राजकारणात कामाला सुरुवात केली.

Minister Abdul Sattar and Ashok Chavan Meet in Nanded News
Beed : गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदार करा ; संभाजीराजेंची मागणी

मराठवाडा आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून चव्हाण ओळखले जातात. त्यांचा अभ्यास चांगला आहे, तसेच ते माझे राजकीय गुरू देखील आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो, असेही सत्तार म्हणाले. तर चव्हाण यांनीही सत्तार यांच्यासोबत असलेल्या मैत्री आणि जिव्हाळ्याच्या संबंधाचा उल्लेख केला.

सत्तार कुठेही असले तरी आमचे मैत्रीचे संबंध कायम आहेत. शंकरराव चव्हाण असतांना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय पक्ष वेगळे असले तरी आमची मैत्री खूप जुनी आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे. त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे, ते निश्चित चांगले काम करतील, असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com