Nanded : प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही..

काॅंग्रेसची नैतिकता संपली आहे. त्याचं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यांचे नेतेच खाजगीत माझ्याकडे हे बोलतात. भारत जोडो यात्रा म्हणजे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही आंबेडकरांनी केली. (Prakash Ambedkar)
VBA Leader Prakash Ambedkar News, Nanded
VBA Leader Prakash Ambedkar News, NandedSarkarnama

नांदेड : राज्यात काॅंग्रेसमध्ये फूट पडणार अशी चर्चा सुरू असतांनाच त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. नांदेडमध्ये झालेल्या धम्म मेळाव्यात त्यांनी काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असा टोला अमित देशमुख, अशोक चव्हाण यांना नाव न घेता लगावला.

VBA Leader Prakash Ambedkar News, Nanded
Prakash Ambedkar : जाती व्यवस्था मोडल्याशिवाय भारत जोडणे अशक्य..

काॅंग्रेसचे (Congress) अनेक नेत खाजगीत आपल्याजवळ अशा प्रकारची चर्चा करतात, असा दावाही आंबेडकरांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असतांना काॅंग्रेसशी युती करू पाहणारे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आता मात्र त्यांच्यावरच टीका करू लागले आहेत. महाविकास आघाडीसोबत जातांना राष्ट्रवादी नको अशी भूमिका घेत काॅंग्रेसशी युतीची तयारी वंचितने चालवली होती. परंतु बोलणीत फिसकटले आणि ही युती काही आकारास आली नाही.

आता प्रकाश आंबेडकर शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत असल्याच्या आणि या संदर्भात त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचे देखील बोलले जाते. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबादेत बोलतांना शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपला पुन्हा सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी फडणवीसांनी काॅंग्रेसच्या २२ आमदारांना फोडण्याची तयारी करून ठेवली असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

त्यानंतर काॅंग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि खैरेंनी आपले विधान मागे घेत दिलगिरीही व्यक्त केली. परंतु नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकरांनी खैरेंच्या या दाव्याला पुष्टी देणारे विधान करत थेट लातूरचे आमित देशमुख आणि नांदेडचे अशोक चव्हाण यांच्यावरच निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसकडे आता काहीही शिल्लक राहिलेले नाही, त्यामुळे लातूरकर आणि नांदेडकर केव्हाही फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत. फडणवीसांना मस्का लावायला देखील ते तयार आहेत. काॅंग्रेसची नैतिकता संपली आहे. त्याचं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यांचे नेतेच खाजगीत माझ्याकडे हे बोलतात.

भारत जोडो यात्रा म्हणजे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही आंबेडकरांनी केली. त्यामुळे खैरेंनी केलेले विधान जरी त्यांनी परत घेतले असले तरी त्याचा वणवा मात्र आता राज्यभरात पसरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com