Nanded : हेमंत पाटील म्हणाले, माझ्या घरासमोरची सुरक्षा काढून घ्या, मी समर्थ..

शिवसैनिकाच्या घराला पोलीस सुरक्षेची गरज नाही. स्वतःच्या घराची सुरक्षा करण्यासाठी शिवसैनिक नेहमी समर्थ असतो.अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची आपली तयारी. ( Mp Hemant Patil)
Mp Hemant Patil Letter to Sp News Nanded
Mp Hemant Patil Letter to Sp News NandedSarkarnama

नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. नुकतीच दिल्लीत शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांकडे नवा गट नेता आणि प्रतोद देखील नेमण्यात आला. (Nanded) राज्यातील आमदारांनंतर खासदारांनीही शिंदे गटाला साथ दिल्यामुळे शिवसेनेला दुसरा धक्का बसला. या सगळ्या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या घर, कार्यालयावर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या संपर्क कार्यालय, निवासस्थान व नांदेड येथील बॅंकेवर देखील बंदोबस्त देण्यात आला. यानंतर काल खासदार पाटील यांनी पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून आपल्या घराबाहेरील सुरक्षा काढून घेण्याची विनंती केली आहे.(Hingoli) मी शिवसैनिक आहे, शिवसैनिकांला बंदोबस्ताची गरज नसते, मी माझी व कुटुंबाची सुरक्षा करण्यास समर्थ असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खासदार हेमंत पाटील शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतल्यानंतर नांदेडमध्ये परतताच त्यांनी खासदार पाटील यांच्यावर टीका केली होती. पाटील यांना दोन्ही जिल्ह्यात रस्त्यावर फिरू देणार नाही, त्यांना गावबंदी करू असा इशारा दिला होता. असे असतांना आपल्याला सुरक्षा नको अस पत्र खासदार पाटील यांनी पोलिसांना दिले आहे.

Mp Hemant Patil Letter to Sp News Nanded
Shivsena : मोठा दाढीवाला, रिक्षावाला, संज्या.. आदित्य यांच्या दौऱ्यात खैरेंची गाडी सुसाट..

शिवसैनिकाच्या घराला पोलीस सुरक्षेची गरज नाही. स्वतःच्या घराची सुरक्षा करण्यासाठी शिवसैनिक नेहमी समर्थ असतो.अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची आपली तयारी असल्याचा इशारा देखील पाटील यांनी पत्रात दिला आहे. माझ्या राजकीय कारकीर्दमध्ये मी नेहमी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. याच सर्वसामान्य जनतेच्या जोरावर नगरसेवक पदापासून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहात मी खासदार म्हणून लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करीत आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in