Nanded : हेमंत पाटील हा रस्त्यावरचा टुकार खासदार ; घरवापसीनंतर वानखेडे कडाडले..

या गद्दारांना धडा शिकवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे, मी यांना दोन्ही जिल्ह्यातील गावात फिरू देणार नाही, त्यांना गावबंदी केली जाईल. (Nanded Shivsena)
Ex.Mp Subhash Wankhede-Mp.Hemant Patil News Nanded
Ex.Mp Subhash Wankhede-Mp.Hemant Patil News NandedSarkarnama

नांदेड : हिंगोलीचा खासदार हेमंत पाटील याची काय परिस्थिती होती हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण आज त्याच्याकडे पाचशे-हजार कोटी रुपये कुठून आले. (Nanded) तो रस्त्यावरचा टुकार खासदार आहे, (Shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याला उमेदवारी दिली आणि पैशासाठी त्याने गद्दारी केली. त्याला हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात एकाही गावात फिरू देणार नाही, गावंबदी करू, असा इशारा नुकतेच घरवापसी केलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिला.

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वानखेडे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या वानखेडे यांनी बंडखोर (Hemant Patil) खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर टीका केली. ५०-१०० कोटी रुपये घेऊन यांनी गद्दारी केली, जायचेच होते तर खासदार, आमदारकीची राजीनामा देऊन पक्षांतर करायचे असते, असेही वानखेडे म्हणाले.

हिंगोलीचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यापाठोपाठ हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. या धक्क्यातून सावरण्यासाठी तसेच भविष्यात बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नव्याने जिल्ह्यात पक्ष बांधणी हाती घेतली.

माजी खासदार सुभाष वानखेडे यांना परत शिवसेनेत प्रवेश देत ठाकरे यांनी बांगर, पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. वानखेडे आज जिल्ह्यात परतले तेव्हा त्यांनी बंडखोरांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. वानखडे म्हणाले, बांगर, पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, पैशाचा आमिषाला आणि भाजपच्या माध्यमातून ईडीच्या कारवाईला घाबरून ते बंडखोरी करून बाहेर पडले.

Ex.Mp Subhash Wankhede-Mp.Hemant Patil News Nanded
Chandrakant Khaire : ठाकरे कुटुंब, शिवसेना हेच आपले पंढरपूर अन् पांडुरंग..

हेमंत पाटील यांना शिवसेने उमेदवारी दिली, खासदार केले आणि आज तेच पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्यावर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करत आहेत. हेमंत पाटील यांची परिस्थिती काय होती हे जिल्ह्यातील लोकांना चागंलेच माहित आहे. पण आज त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आली आहे, ति कुठून आली.

या गद्दारांना धडा शिकवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे, मी यांना दोन्ही जिल्ह्यातील गावात फिरू देणार नाही, त्यांना गावबंदी केली जाईल. शिवसेना दुप्पट जोमाने वाढेल आणि आम्ही गद्दारांच्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील वानखेडे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in