Nanded : श्रीजया, सुजया चव्हाण यांच्यानंतर शिवाणी वडेट्टीवार `भारत जोडो`त सहभागी..

शिवाणी म्हणाल्या,आज भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील तरुण, शेतकरी आणि महिलांचे प्रश्न आणि समस्या मांडल्या. (Bharat Jodo)
Bharat Jodo Rally in Nanded News
Bharat Jodo Rally in Nanded NewsSarkarnama

नांदेड : राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. या यात्रेचे महाराष्ट्रात अभुतपूर्व असे स्वागत करण्यात आले. राहूल गांधी यांनी देगलूरमध्ये दाखल होताच मशाल पदयात्रा काढत भारत जोडो अभियानाला महाराष्ट्रातही सुरूवात केली. आज सकाळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया व सुजया या देखील राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.

Bharat Jodo Rally in Nanded News
Aurangabad : राजकारण वेगळं मैत्री वेगळी म्हणत, शिंदेची खासदार चषक स्पर्धेला भेट..

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी देगलूर आणि यात्रेच्या मार्गावर लावण्यात आलेल्या होर्डिंगजवर देखील श्रीजया यांचे फोटो लागले आहेत. (Congress) त्यामुळे भारत जोडोच्या निमित्ताने श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री होत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Rahul Gandhi)

ही चर्चा सुरू असतांनाच आता अशोक चव्हाणांच्या मुलींनंतर काॅंग्रेसचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार यांनी देखील राहूल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग नोंदवला.

शिवाणी वडेट्टीवार यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. सर्वात आनंदाचा क्षण असा उल्लेख करत शिवाणी म्हणाल्या,आज भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील तरुण, शेतकरी आणि महिलांचे प्रश्न आणि समस्या मांडल्या. देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथून निघालेल्या पदयात्रेत शिवाणी सहभागी झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in