Nana Patole:भाजपच्या विखारी प्रचाराला काॅंग्रेसचे दहा हजार गांधीदूत देणार प्रत्युत्तर

तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे.(Nana Patole)
Congress State President Nana Patole

Congress State President Nana Patole

Sarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या (Bjp) या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे (Congress) १० हजार गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

काँग्रेसच्या जॉईन कॉंग्रेस सोशल मीडिया मिशन १० हजार, या मोहिमेचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते.

मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार म्हणाले , प्रदेश कॉंग्रेसकडून मी गांधीदूत ही सोशल मिडिया मोहीम १ वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यभरातील सुमारे पंधरा हजार लोकांनी नोंदणी केली होती व त्यांची माहिती प्राप्त झाली होती.

या पंधरा हजार जणांमधून दहा हजार लोकांना "जॉईन कॉंग्रेस सोशल मीडिया मिशन १००००" या मोहिमेतून कॉंग्रेसचे सोशल मिडिया पदाधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. भाजपकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल आणि सत्य माहिती जनतेसमोर आणेल.

<div class="paragraphs"><p>Congress State President Nana Patole</p></div>
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त

भाजप ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, संघटन सरचिटणीस देवानंद पवार व सोशल मीडियाचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com