दुर्राणी यांना नाना पटोलेंकडून काॅंग्रेस प्रवेशाची ऑफर; सेना-भाजपकडूनही प्रयत्न सुरू
Mla Babajani DuraniSarkarnama

दुर्राणी यांना नाना पटोलेंकडून काॅंग्रेस प्रवेशाची ऑफर; सेना-भाजपकडूनही प्रयत्न सुरू

(Congress state president Nana Patole contacted Babajani by phone) बाबाजानी यांचे नेतृत्व व्यापक आणि सर्व-जाती धर्मीयांशी सलोख्याचे संबंध हे त्यांचे वैशिष्ट समजले जाते.

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीला कंटाळून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या आमदार बाबाजानी दुर्रानी यांना काँग्रेस, शिवसेना व भाजप या तिन्ही पक्षामधून आॅफर येत असल्याची माहिती आहे. सर्व धर्म समभाव बाळगणारे दुर्रानी यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी अनेक पक्षांनी पायघड्या घालण्यास सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्हा अध्यक्ष राहिलेल्या दुर्राणी यांनी १६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु, आठ दिवस त्यांनी या राजीनाम्याबद्दल गुप्तता पाळली होती. मात्र काल त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.

बाबाजानी यांच्या राजीनाम्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दुर्रानी यांच्यासारखा अनुभवी राजकारणी नेता पक्ष सोडणार म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाबाजानी यांचे नेतृत्व व्यापक आणि सर्व-जाती धर्मीयांशी सलोख्याचे संबंध हे त्यांचे वैशिष्ट समजले जाते. त्यामुळे त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग प्रत्येक पक्षात आहे.

त्यामुळेच गेल्या सात वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. परंतु, गेल्या एक-दीड वर्षापासून पक्षातील जिल्हा स्तरावर होत असलेली अंतर्गत बंडाळी बाबाजानी दुर्रानी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे अखेर वैतागून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. बाबाजानी यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ३८३ राष्ट्रवादीचे पदाधिकारी सामुहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

Mla Babajani Durani
शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच माझे नाव गुटखा प्रकरणात गोवले

जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुर्राणी हे पक्षही सोडणार, अशा चर्चा देखील जिल्ह्यात सुरू आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काॅंग्रेसह विरोधी पक्ष भाजपने देखील दुर्राणी यांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाबाजानी यांना फोनवरून संपर्क साधला असून त्यांची विचारपूस केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

केवळ ही चर्चा विचारपूस करण्यापर्यंतच मर्यादित नव्हती, तर पटोले यांनी दुर्राणी यांना काॅंग्रेसमध्ये येण्याची आॅफर दिल्याची देखील माहिती आहे. याशिवाय शिवसेना व भाजपचे राज्यातील मोठे नेते देखील दुर्राणी यांची मनधरणी करतअसल्याचे बोलले जाते.

आता दुर्राणी जिल्हाध्यक्ष पदाप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचाही राजीनामा देणार का? दिला तर ते कोणत्या पक्षात जाणार याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, कालच दुर्राणी यांनी आपण गेल्या ४० वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करतो आहोत. यापुढेही पक्षात एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबायला तयार नाहीत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in