Nana Patole : `भारत जोडो` यात्रा म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढाच..

भारत जोडो यात्रा ही देश जोडण्यासाठीची यात्रा आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्टीकोनातून न पाहता देशाची लोकशाही, एकता, अखंडता टिकावी असे वाटणाऱ्या प्रत्येकाने यात सहभागी झालं पाहिजे. (Nana Patole)
Congress Leader Nana Patole News, Aurangabad
Congress Leader Nana Patole News, AurangabadSarkarnama

नांदेड : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. दुसरा स्वातंत्र्य लढा म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. देशातील आजची परिस्थिती पाहिली तर खरचं आपल्याला स्वातंत्र्य आहे का? असा प्रश्न पडतो. आमच्या नेत्या स्व. इंदिरा गांधी यांनी देखील सातत्याने मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देखील आपल्याला कायम लढा द्यावा लागेल, असे म्हणत होत्या. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील आपल्या अनेक भाषणांमधून केलेले आहे. देशात सध्या जी परिस्थीती आहे, ती पाहता भारत जोडो यात्रा म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढाच म्हणावा लागेल, अशा शब्दात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

Congress Leader Nana Patole News, Aurangabad
Shivsena : सत्तारांच्या बालेकिल्ल्यात माघार, पण भुमरेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार..

भारत जोडो यात्रा उद्या ७ नोव्हेंबर रोजी तेलंगाणा मार्गे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहे. (Congress) देगलूर मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रे संदर्भात माहिती देण्यासाठी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी (Nana Patole) पटोले यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही देश जोडण्यासाठीची यात्रा आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्टीकोनातून न पाहता देशाची लोकशाही, एकता, अखंडता टिकावी असे वाटणाऱ्या प्रत्येकाने यात सहभागी झालं पाहिजे.

पक्ष, जात-पात या सगळ्यांच्या पलीकडे ही यात्रा आहे. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना भारत जोडो यात्रेचे निमंत्रण दिले आहे. ते सगळेच यात सहभागी होतील, पण याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. देशातील सद्य परिस्थिती अतिशय बिकट आहे, काॅंग्रेस या विरोधात लोकशाही पद्धतीने लढाई लढते आहे. आमच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देशभरात हजारो आंदोलनं केली.

प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयात आमच्या निवेदनांचे ढीग साचले आहे. पण सत्ताधारी त्याची दखल घ्यायला तयार नाहीत. आमच्या दोन लाखांहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना जामीन मिळणार नाही, अशी कलमे लावण्यात आली असल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in