Nana Patole:मी खुर्चीत असतो तर एसटीचे आंदोलन इतके दिवस चाललेच नसते..

यावर एसटी कर्मचाऱ्यांनीही नाना आपणही सत्तेत आहात, आपण काहीही करू शकता असे म्हणत त्यांची कोंडी गेली. (Nana Patole)
Nana Patole, Congress State President

Nana Patole, Congress State President

Sarkarnama

बुलडाणा ः राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आदोलन दोन महिन्याहून अधिक काळापासून सुरू आहे. या संपामुळे राज्यातील सर्वसामान्य, विद्यार्थी सगळ्यांचेच प्रचंड हाल होत आहेत. (Congress) पगारवाढ देऊन व इतर मागण्या मान्य केल्यानंतरही विलनीकरणाच्या मुद्यावर एसटी संघटना अडून बसल्या आहेत. काही प्रमाणात कर्मचारी कामावर परतले असले तरी ते पुरेसे नाही.

परिवहन खाते शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे असले तरी हा प्रश्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. एसटी संपाच्या (St Strike) अनुषंगाने काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक विधान केले आहे. `मी खुर्चीत असतो तर एसटीचे आंदोलन इतके दिवस चाललेचं नसते`, असे ते म्हणाले.

आता त्यांच्या या विधानावरून वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. बुलडाणा-खामगांव दौऱ्या दरम्यान, नाना पटोले यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचारी व संघटनांच्या प्रतिनिधींची खामगाव येथे भेट घेतली आणि वरील विधान केले.

पटोले म्हणाले, `मी खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चाललं नसतं`, यावर एसटी कर्मचाऱ्यांनीही नाना आपणही सत्तेत आहात, आपण काहीही करू शकता असे म्हणत त्यांची कोंडी गेली.

<div class="paragraphs"><p>Nana Patole, Congress State President</p></div>
भांबळेचे खोटे आरोप सहन करणार नाही ; सापडलेला गहू अन् त्या शेताशी माझा संबंध नाही

`आम्ही सत्तेत जरी असलो तरी आमची सत्तेतील आस का आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, असे सांगत वेळ मारून नेली. पण पटोले यांच्या या विधाननंतर काँग्रेस नेमकी सत्तेत कशासाठी आहे ? एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाना पटोलेंना कळाले की नाही? या बद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com