Nana Patole : देशात काॅंग्रेस आजही बापच, सुजय विखे अजून लहान..

देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, गलवान खोऱ्यात चीनने भारताच्या जवानांना क्रूर पद्धतीने मारले. ५६ इंचाची छाती आणि एक मारला तर शंभर मारूची भाषा करणारे यावर मात्र गप्प राहिले. (Nana Patole)
Congress Leader Nana Patole-Sujay Vikhe
Congress Leader Nana Patole-Sujay VikheSarkarnama

औरंगाबाद : ज्या पक्षाचे खासदार म्हणून सुजय विखे मिरवतात, ती भाजप देशात काॅंग्रेसने केलेल्या विकासावरच आपले ढोल बडवत आहे. देशात आजही काॅंग्रेस पक्ष बापच आहे, सुजय विखे (Sujay Vikhe) अजून खूप लहान आहेत, असा टोला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला. औरंगाबादेत काॅंग्रेस डिजिटल सदस्यता नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पटोले औरंगाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी विविध प्रश्नांवर आपले मत मांडले. (Maharashtra)

महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना नगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको तर काॅंग्रेस वऱ्हाडी असल्याची टीका केली होती. या संदर्भात विचारले तेव्हा पटोले यांनी देशात आजही काॅंग्रेस बापच असल्याचे सांगत विखे यांच्या विधानावर भाष्य करावे इतके ते मोठे नाहीत, असा टोला लगावला.

पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे देश आणि देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये जे दबावाचे आणि राजकीय सुडाचे राजकारण केले तोच पॅटर्न त्यांनी आता विरोधकांना नामोहरम करण्यासाठी राबवायला सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या काळात खूप विकास झाला असं भाजपचे नेते सागंत फिरत आहेत, मुळात स्वातंत्र्यांनतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या काॅंग्रेसने केलेल्या विकासकामांमुळेच आज देशात प्रगती दिसते आहे.

काॅंग्रेसच्या विकासकामांना दाखवत भाजप तो आपण केल्याचे सांगत ढोल बडवत आहेत. देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत, गलवान खोऱ्यात चीनने भारताच्या जवानांना क्रूर पद्धतीने मारले. ५६ इंचाची छाती आणि एक मारला तर शंभर मारूची भाषा करणारे यावर मात्र गप्प राहिले. केवळ विरोधकांना संपवण्यासाठी सुडबुद्धीचे राजकारण करायचे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून त्रास द्यायचा हाच प्रकार सध्या भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये सुरू आहे.

Congress Leader Nana Patole-Sujay Vikhe
Aurangabad : सत्तार भाई - इम्तियाज भाई यांचे `मिले सुर मेरा तुम्हारा`..

मुख्यमंत्री व त्यांच्या नातेवाईकांना ईडी, सीबीआयच्या धाडी टाकून देण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याची चौकशी देखील होऊ द्यायची नाही आणि ईडीचे छापे मारायचे हे खालच्या स्तराचे राजकारण सध्या राज्यात सुरू असल्याचा आरोप देखील पटोले यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com