Name Change Politics News : एमआयएमची माघार, सकल हिंदू मोर्चाच्या तयारीत..

Marathwada : सकल हिंदू एकत्रिकरण समितीने उद्या क्रांतीचौकातून मोर्चा काढून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.
March For Support Name Change News
March For Support Name Change NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर होवून दोन आठवडे उलटले, मात्र यावरून सुरू असलेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखालील साखळी उपोषण १४ दिवसांनी मागे घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे सकल हिंदू एकत्रिकरण समिती नामांतराच्या समर्थनात उद्या (ता.१९) रोजी शहरातून मोर्चा काढण्याच्या तयारीत.

March For Support Name Change News
Amruta Fadnavis News :अमृता फडणवीसांच्या आडून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न? पोलीस तपासात माहिती उघड

१६ रोजी मनसेने स्वप्नपुर्ती मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. (Aurangabad) त्याच्या दुसऱ्या दिवशी इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत साखळी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. आता (MNS) मनसेच्या मोर्चामुळे हे आंदोलन एमआयएमने मागे घेतले, ते आम्हाला घाबरले असा दावा मनसेच्या जिल्हाध्यक्षांकडून केला जातोय, मात्र वस्तुस्थिती तशी नाही.

इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणाच्या नवव्या आणि दहाव्या दिवशी भावनिक आवाहन केले होते. फडणवीस यांना आंदोलन मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असतांना आता तर उपोषण सुरूच राहील असा आक्रमक पावित्रा इम्तियाज यांनी घेतला होता. मात्र दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर इम्तियाज यांना शहरातील आंदोलन पुढे सुरू राहील की नाही? ही शंका त्यांना सतावत होती. इम्तियाज दिल्लीला जाताच आंदोलनाचा मंडप ओस पडला होता.

त्यामुळे अधिवेशनाच्या सुटी काळात शहरात आलेल्या इम्तियाज यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. हा घेत असतांना विरोधकांकडून शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा, बाहेरच्या राज्यातील नेत्यांना आणण्याचा प्रयत्न असे आरोप त्यांनी केले. शिवाय पुढे रमझान असल्याने शांतता कायम राहावी, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ही कारणे जरी त्यांच्याकडून पुढे केली असली तरी आंदोलन फारकाळ सुरू ठेवता येणार नाही हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.

शिवाय उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र, शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया, सोशल मिडियावर इम्तियाज यांच्याविरोधात व्यक्त होत असलेला संताप पाहता त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आणि शहरातील वातवरण निवळण्यास मदत करणारा ठरणार आहे. एकीकडे एमआयएमने माघार घेत एक पाऊल पुढे टाकले असले तरी त्यांच्या राजकारणाला आता सकल हिंदू एकत्रिकरण समितीने उद्या क्रांतीचौकातून मोर्चा काढून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.

March For Support Name Change News
Tanaji Sawant News; आशा सेविकांच्या वेतन, सेवेबाबत धोरण ठरवणार

पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मनसेच्या मोर्चाला मर्यादित संख्या असल्याने पोलिसांना तो रोखता आला होता. पण सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या मोर्चाला हजारोंची संख्या जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय उद्या रविवार असल्याने तरुण मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांपुढे हा मोर्चा रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नामांतराचा विषय केंद्र आणि राज्य सरकारने निकाली काढला आहे. तो दोन्ही बाजूंनी स्वीकारून शहराच्या विकासाचे राजकारण आता केले पाहिजे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com