उद्धवसाहेब कोरोनाने वडील वारले होते, दु:खात असताना माझे जिल्हाप्रमुखपद काढले...

Shivsena| Beed politics| बीडचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पत्राद्वारे आपली खंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
Shivsena| Beed politics|
Shivsena| Beed politics|

बीड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांना पक्षाकडून मिळणारी वागणूक, मातोश्रीवरील प्रवेश, ठराविक नेत्यांचा मातोश्री व उद्धव ठाकरे यांना पडलेलं कोंडाळं आदी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. बंडामागे देखील हीच प्रमुख करणे पुढे केली जात आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले जात असताना त्यांच्याच पक्षाच्या तत्कालीन जिल्हाप्रमुखाचे वडील कोरोनाने वारल्यानंतर आणि त्यांच्यासह अख्खे कुटुंब कोरोनाने गंभीर असताना ठाकरेंकडून साधी विचारणा वा सांत्वन आणि धीर दिला गेला नसल्याचे या पत्रामुळे समोर आले आहे. सचिन मुळूक यांनी बुधवारी हे पत्र लिहले आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसैनिक म्हणून एकनिष्ठेने काम करत आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना मोठा संघर्ष करावा लागला. परंतु, कोरोनाने माझे वडील वारलेले होते, नंतर आई आणि माझ्यासह सगळ्या कुटुंबाला कोरोना झालेला असताना अशा गंभीर आणि दुःखद प्रसंगात आपलटकडून धीर मिळण्याऐवजी माझे शिवसेना जिल्हा प्रमुखपद काढून घेण्यात आले, अशी सल शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन मुळूक यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख व माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

या पत्रात देखील सचिन मुळूक यांनी आपल्या कुटुंबात घडलेल्या दुःखद घटना व गंभीर प्रसंग काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना कळूच दिल्या नाहीत असे या पात्रात म्हटले आहे. सचिन मुळुक हे शाखाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, युवा सेना, विद्यार्थी सेना अशा विविध आघाड्यांतून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर गेले होते. वर्षभरापूर्वी त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटविले आहे. या पदापर्यंत पोचायला मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु माझ्याबाबत व्यक्तिगत सूड भावनेतून केलेला प्रकार इतर शिवसैनिकांबाबत घडू नये असेही मुळूक यांनी पत्रात म्हटले आहे. कदाचित आपल्या कुटुंबाबाबत घडलेला प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळला असता तर त्यांनी निश्चितीच सांत्वन करून धीर दिला असता असेही या पात्रात म्ह्टले आहे. अलीकडे आई टीव्ही पाहत असताना शिवसेनेबाबत काही बातमी आली तर ती टीव्ही बंद करते आणि तिला आपण काहीही सांगू शकत नाही, अशी खंत देखील सचिन मुळूक यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com