Chhatrapati Sambhajinagar Crime News Update: मुस्लिम तरुणीला मारहाण प्रकरण: तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

तरुणीच्या आई वडीलांनी हे अपापसातील प्रकरण असल्याचे सांगत याबद्दल तक्रार देण्यास नकार दिला.
Chhatrapati Sambhajinagar Crime News Update:
Chhatrapati Sambhajinagar Crime News Update: Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला भर रस्त्यात मारहाण करत प्रचंड त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Crime news)  या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहेत. (Muslim girl assault case: Three in police custody)

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलिसांनी दोघांना आणि उस्मानपुरा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीला तिच्याच नातेवाईकांनी भर रस्त्यात तिला प्रचंड त्रास दिल्याची धक्कादायक घटना आज (२६ एप्रिल) दुपारी समोर आली आहे. (Crime news) संबंधित मुलीचा मोबाईलही या त्या टोळक्याने काढून घेत तिला त्रास दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Crime News Update:
Sanjay Raut Statement: ''आम्ही फडणवीसांच्या जवळचे; त्यांचं अंतरंग धगधगतंय, ते बोलतात एक...''; राऊतांनी वात पेटवली

या घटनेचा व्हिडीओ व्हायरलं झाल्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील एक तरुणी रस्त्याने चालली असताना त्या मुलीची छेड काढत तिला काही टवाळखोर तरुण त्रास देताना दिसत आहे. हे तरुण तिचा फोन हिसकावून घेत तिला शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मात्र संबंधित तरुणीच्या आई वडीलांनी हे अपापसातील प्रकरण असल्याचे सांगत याबद्दल तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकऱणात गुन्हा दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News Update:
PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची शंभरी, पिंपरीमध्ये भाजपकडून जोरदार तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ तारखेची असल्याची माहिती आहे. मुलगी तिच्या एका मित्राबरोबर फिरायला गेली होती. यावेळी पिडीत मुलीच्या ओळखीच्या तरुणांनी तिची रस्त्यावर छेड काढण्यास सुरुवात केली. तो मुलगा कोण आहे, अशी विचारणा करत तिला भररस्त्यात मारहाणही करण्यात आली. टवाळखोरांनी तिचा बुरखाही फाडला. ही घटना घडत असताना तिच्यासोबत असलेले मित्र मैत्रिणीही निघून गेले. त्यानंतर या टोळक्याने मुलीचा पाठलाग करत तिला भर रस्त्यात त्रास देत तिला मारहाण केली. विशेष म्हणजे तरुणीला मारहाण करणाऱ्या टोळक्यातीलच एकाने तो व्हिडीओ काढल्याचे दिसत आहे. (Hindu-Muslim Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com