Municipal Commissioner G. Shrikant: मनपा आयुक्तांचा अनोखा उपक्रम, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ठेवली पार्टी..

G. Shrikant Arranged Party For HSC Failed Students: नापास झालेले किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचे आयोजन.
Municipal Commissinoer G.Shrikant News
Municipal Commissinoer G.Shrikant NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : नुकतेच महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजु झालेले जी.श्रीकांत हे आपल्या वेगळ्या कार्यशैलीसाठी परिचित आहे. (Municipal Commissinoer G.Shrikant News) अगदी लातूर येथे जिल्हाधिकारी असतांना स्वतः मोबाईल नंबर सार्वजनिक करण्याचा त्यांचा हेतू असो, की मग मुलीच्या वाढदिवसाला जुन्याकाळातील अभिनेते, अभिनेत्रीच्या वेशभुषेत सादर केलेली गाणी असोत ते कायम चर्चेत असतात.

Municipal Commissinoer G.Shrikant News
Shinde Vs Thackeray : दसरा मेळाव्यानंतर वर्धापन दिनावरुनही राजकारण तापणार; शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

कुटुंबात रमणारे आणि प्रशासकीय सेवेत काम करतांना जनतेसाठी सदैव उपलब्ध अशी ख्याती असलेल्या जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगरात देखील आपल्या वेगळपणाची झलक दाखवून दिली. (Municipal Corporation) नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. (Aurangabad) राज्यभरात या परिक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी हजारो विद्यार्थी या परिक्षेत नापास झाले.

यश विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आवश्यक असले तरी ते मिळाले नाही म्हणून खचून जावू नका, नव्या विश्वासाने उमेदीने पुन्हा प्रयत्न करा, असा संदेश नेहमीच दिला जातो. (Marathwada) मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्याहीपुढे एक पाऊल टाकत चक्क अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पार्टीचे आयोजन केले आहे. या आयोजनामागे विद्यार्थ्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पुन्हा लढण्याची प्रेरणा देणे हा आहे.

वेगळे लोकोपयोगी निर्णय घेणारे आयुक्त जी. श्रीकांत यांनी माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रयोगाची कॉपी करीत बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी फेल्युअर पार्टी ठेवली आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचू नये यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. दहावी आणि बारावीत नापास होणारे आणि कमी गुण मिळालेले विद्यार्थी नैराश्यात जातात. त्यामुळे त्यांचे पुढील उच्च शिक्षण धोक्यात येऊन त्यांच्या कौशल्यावरही परिणाम होतो.

त्यामुळे त्यांना या काळात मार्गदर्शन आणि नवीन उभारी मिळावी, यासाठी पाठीवर थाप मारून चाल म्हणण्याची गरज असते. त्यासाठी माजी मंत्री दिवाकर रावते यांनी या विद्यार्थ्यांसाठी पहिला उपक्रम राबवला होता. त्यानंतर आता संभाजीनगर मनपा प्रशासक श्रीकांत यांनी देखील बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १३,८३६ नापास झालेले किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी सकाळी १० वाजता सिडको एन-५ येथील लाइट हाऊस, धर्मवीर संभाजी शाळेच्या शेजारी फेल्युअर पार्टीचे आयोजन केले आहे. श्रीकांत यांच्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com