Parali News : मुंडे-बहिण भावाकडून संघर्ष टाळण्याचा प्रयत्न, वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध ?

Sugar Factory Election : पंकजा मुंडे यांनी स्वतःसह आई आणि दोन्ही बहिणींचे देखील अर्ज दाखल केले आहेत.
Pankaja Munde vs Dhananjay Munde News
Pankaja Munde vs Dhananjay Munde NewsSarkarnama

Beed News : परळीतील जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत धनंजय आणि पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये संघर्ष पहायला मिळाला. मात्र वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory Election)निवडणुकीत तो टाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असल्याचे बोलले जाते. २१ संचालकांच्या निवडीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ५० जणांनी आपले अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.

Pankaja Munde vs Dhananjay Munde News
Ashok Chavan On divisional commissioner : केंद्रेकरांच्या शिफारशीला चव्हाणांचे समर्थन, सरकारने निर्णय घ्यावा..

तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्वतःसह आई आणि दोन्ही बहिणींचे देखील अर्ज दाखल केले आहेत. धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्याकडून अजय मुंडे यांनी देखील शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भावात चुरस पहायला मिळेल असे चित्र रंगवले जात असले तरी दोघांनी मात्र संघर्ष टाळत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जाते.

अर्थात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच या संदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. (Parli) दरम्यान, गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी शेवटच्या (ता.१६) दिवशी २१ जागांसाठी एकूण ५० अर्ज दाखल करण्यात आले. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, प्रज्ञा मुंडे, अजय मुंडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी युती सरकारच्या काळात केली होती. यानंतर आजपर्यंत कायम वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मुंडे व त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. या कारखान्याची निवडणूक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीडचे निवडणूक अधिकारी समृत जाधव यांनी ९ मे रोजी घोषित केली होती.

उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता.१७) होऊन उमेदवारी अर्ज मागे घेणे १८ मे ते १ जून, मतदान ११ जून तर १२ जूनला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः किंवा परिवारातील कोणाचाही अर्ज दाखल केलेला नाही. फक्त एकमेव अजय मुंडे यांचा त्यांच्या गटातून परिवारातील उमेदवारी अर्ज आहे. माघार घेण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत असल्याने या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com