Beed Politics: मुंडे बहिण-भावात रंगली श्रेयवादाची लढाई; वाचा, नेमकं प्रकरण काय?

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद कायम समोर येत असतात
Beed Politics:
Beed Politics:Sarkarnama

Beed Politics: लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तुम्ही गेल्या पाच वर्षात लोकांचे कल्याण केलं नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. परळीतील टोकवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पंकजा मुंडे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. परळीत विकास कामांच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन मुंडे बहीण भावात श्रेयवाद सुरु झाला आहे. काम आमच्या सरकार असताना आमच्या कामाचे उदघाटन तुम्ही का करता? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला होता. त्यावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांनां जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Beed Politics:
PCMC News: पिंपरी चिंचवडला गडकरींकडून मोठं गिफ्ट: 'या' मार्गांवर होणार नवे फ्लाय ओव्हर

धनंजय मुंडे म्हणाले, गेल्या तीन वर्षांच्या काळात मंत्री असताना माझ्या मतदार संघातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम मी केलं. मग हे आधीच्या सरकारमधील लोकांनी का केलं नाही. ही टीका नाही, पण ते म्हणतात आम्ही आयत्या पीठावर रेघोट्या मारत आहोत. मग आम्हालाही तुम्ही मागच्या १० वर्षांच्या काळात कोणती विकासकामे केली, हे विचारण्याचा अधिकार आहे. पण आम्ही ते विचारत नाही आणि आम्हाला तो मुद्दा काढायचा सुद्धा नाही.

आम्हाला आमच्या मतदार संघातील जनतेचा विकास करायचा असल्याचं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर निशाणा साधला. याचंवेळी त्यांनी वैद्यनाथ कारखान्यावरुनही त्यांनी टीका केली. जलजीवन मिशन योजना ही केंद्राची योजना आहे. मग यात माझा काय संबंध. पण महाविकास आघाडी सरकार असताना मी या गावातील योजनेचा आराखडा करुन ठेवला होता म्हणून मी उघडपणे भूमिपूजन करत असल्याचं थेट उत्तरही धनंजय मुंडेंनी दिलं.

तसेच, 'सरकार जरी बदललं तरी आम्हाला फरक पडत नाही. कारण परळीला दिल्याशिवाय कोणतंही सरकार पुढे जाऊ शकत नाही, अशी तरतूद मी करुन ठेवली आहे, असेही धनंजय मुंडेंनी नमुद केलं. येत्या दोन वर्षात या मातीचा कायपालट करणार आहे. असं आश्वासनही यावेळी धनंयज मुंडेंनी दिलं. तर असे एक तरी काम आपण केलयं का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com