Ambadas Danve : आमच्या सरकारच्या `पंचसुत्री`चे फडणवीसांनी `पंचामृत` केले..

Mumbai : आताच्या सरकाराने बेरंग असा अर्थसंकल्प मांडला आहे. जनतेशी या सरकारला कोणतेही देणघेणं नाही.
Ambadas Danve, Devendra Fadanvis Budget News
Ambadas Danve, Devendra Fadanvis Budget NewsSarkarnama

Budget Session : राज्यातील सत्तांतरानंतरचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. यावर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचसुत्रीवर आधारित अर्थसंकल्प सादर व्हायचा. फडणवीसांनी पंचामृत या नव्या नावाने अर्थसंकल्पाचे वर्णन केले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे.

Ambadas Danve, Devendra Fadanvis Budget News
Maharashtra Budget : ठाकरेंनी अर्थसंकल्पाचे एका शब्दांत केले वर्णन; म्हणाले...हा तर गाजर हलवा संकल्प!

सरकार जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दानवे म्हणाले, महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पंचसूत्री होती त्याचेच नाव बदलून पंचामृत करण्यात आले आहे. (Budget Session) राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यांना कुठेही यात दिलासा मिळालेला नाही.

ज्या योजना अजित पवारांनी अर्थमंत्री असताना जाहीर केल्या होत्या त्याच घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहेत. विविध जाती-धर्मातील महान व्यक्तींच्या नावे महामंडळाची घोषणा करत सरकारने अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचे काम देखील केले आहे. या अर्थसंकल्पामध्ये फक्त जुमलेबाजी आहे, कुठेही महिला, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न यात झालेला नाही.

तरुण, बेरोजगारांच्या हाताला काम देण्याबाबत काही ठोस कार्यक्रम सांगितला गेला नाही. त्यामुळे आताच्या सरकाराने बेरंग असा अर्थसंकल्प मांडला आहे. जनतेशी या सरकारला कोणतेही देणघेणं नाही. पैसे उत्पनाचा स्त्रोतच नाही तर या घोषणा कशाप्रकारे केलेल्या आहेत असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com