Mumbai : उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर, शिरसाट यांना पुन्हा डावलले ?

मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाटांच्या नाराजीत आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mla Sanjay Shirsat)
Mla Sanjay Shirsat News, Mumbai
Mla Sanjay Shirsat News, MumbaiSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांमधील नाराजी काही केल्या थांबत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण नऊ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता पक्ष नेते आणि उपनेत्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. यामध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाटांच्या नाराजीत आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दादरमधील आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हा देखील अशाच राजकीय कटाचा भाग असल्याचे सरवणकर यांच्या समर्थकांना वाटत आहे. (Marathwada) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव आणि गुलाबराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. आता नेतेपदी आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

मागील महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजी संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली होती. आता पुन्हा त्यांना पक्षाच्या नेतेपदी स्थान न दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल या आशेवर असणाऱ्या संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Mla Sanjay Shirsat News, Mumbai
Shivsena : विधानसभेतला व्हिडिओ ट्विट करत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना उघडे पाडले..

दरम्यान, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवरून दादर येथे झालेल्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वादावादी आमदार सदा सरवणकर यांच्यावरच उलटली आहे. सत्तेत असतानाही गुन्हा दाखल झाल्याने सरवणकर हे नाराज आहेत. त्यामुळे फुटलेल्या आमदारांची नाराजी शिंदे सरकार पुढील डोकेदुखी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in