MPSC Exam News : एमपीएससीकडून माहिती विभागाच्या जागांसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ..

Maharashtra : मॅटचे सदस्य न्यायमूर्ती व्ही. डी. डोंगरे आणि बिजय कुमार यांनी लोकसेवा आयोगाला नोटीस बजावत जाहिरातीत बदल करण्याच्या सूचना केल्या.
MPSC Exam News
MPSC Exam NewsSarkarnama

High Court : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) निर्देशानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Exam News) माहिती विभागांच्या जागांसदर्भात २१ एप्रिल २०२३ रोजी पुन्हा एकदा शुद्धिपत्रक जाहीर करत, परीक्षा कालावधी वाढवला आहे. आता नवीन अहर्ताधारकांना अर्ज करण्याची अंतिम तारिख आठ मे २०२३ अशी केली आहे. आयोगाने आता १६ शैक्षणिक अहर्ताधारकांना या परीक्षेसाठी पात्र ठरविले असल्याने या निर्णयाचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

MPSC Exam News
News of Mla Shirsats Tractor theft : आमदार शिरसाटांचा ट्रॅक्टर चोरट्यांनी पळवला..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exam) माहिती संचालक, माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक माहिती संचालक आणि सहायक माहिती संचालक या पदांसाठीच्या परीक्षांसाठी ३० डिसेंबर २२ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. (Aurangabad High Court) याचिकाकर्ते पत्रकार अनिल पौलकर यांनी अ‍ॅड. सुहास उरगुंडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

जाहिरातीतील अट क्रमांक ८. १. आणि सामान्य प्रशासन विभागाच्या १८ डिसेंबर २०१५ रोजीच्या अधिसूचनेतील परिच्छेद क्रमांक ३ ते ५ मधील अटींना आव्हान दिले. (Maharashtra) सुनावणीत अ‍ॅड. उरगुंडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, याचिकाकर्ता हे मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता अंतर्गत संप्रेषण आणि पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधर आहेत. पत्रकारितेत त्यांना १८ वर्षांचा अनुभव आहे व ते उपरोक्त पदांसाठी पात्र आहेत. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील अट क्रमांक ८.१. संविधानाशी विसंगत आहे.

परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२३ असल्याचे लक्षात घेऊन न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी प्रतिवाद्यांना तत्काळ म्हणणे दाखल करण्याचे आदेश दिले. तेव्हा लोकसेवा आयोगाने १० एप्रिल २०२३ रोजी शुद्धिपत्रक काढून परीक्षेचा कालावधी वाढविल्याचे स्पष्ट केले. तेव्हा खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या नवीन मूळ अर्जास तत्काळ प्राधान्य द्यावे, असे निर्देश देत याचिकाकर्त्याला मॅट मध्ये जाण्यास सांगितले. त्यानुसार पौलकर यांनी अ‍ॅड. उरगुंडे यांच्यामार्फत मॅटमध्ये अर्ज केला. मॅट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, लोकसेवा आयोगाने केवळ पदवीधरांनाच या परीक्षेसाठी पात्र ठरवले आहे.

पदव्युत्तर, पदवीधरांना पात्र ठरवलेले नाही. तेव्हा मॅटचे सदस्य न्यायमूर्ती व्ही. डी. डोंगरे आणि बिजय कुमार यांनी लोकसेवा आयोगाला नोटीस बजावत जाहिरातीत बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून त्यात परीक्षेत पात्र असल्याच्या अटीत एम. ए. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन यांचा सुद्धा समावेश केला. तसेच नवीन अहर्ताधारकांना अर्ज करण्यासाठी ८ मे २०२३ ही अंतिम तारीख करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी अ‍ॅड. उरगुंडे यांना अ‍ॅड. रवींद्र वानखेडे यांनी सहकार्य केले तर लोकसेवा आयोगातर्फे अ‍ॅड. एम. पी. गुडे यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in