Mp Hemant Patil News : कोणी आपल्या जीवावर उठेल असे काम करू नये, खासदार पाटलांचा सल्ला..

Shivsena : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.
Mp Hemant Patil-Sanjay Jadhav News
Mp Hemant Patil-Sanjay Jadhav NewsSarkarnama

Hingoli : खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी ३ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे, यापुर्वी रिंधा प्रकरणात ते नांदेडच्या एसपीला भेटले होते, तेव्हा आमची चर्चा झाली होती. त्यामुळे जीवे मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रकार गंभीर असून आपण या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणार आहोत, असे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी `साम` टीव्हीशी बोलतांना सांगितले.

Mp Hemant Patil-Sanjay Jadhav News
Mp Sanjay Jadhav News : जाधवांना जीवे मारण्यासाठी दीड वर्षापुर्वी एक अन् आता तीन कोटींची सुपारी..

परंतु कोणी आपल्या जीवावर उठेल असे काम आपण करू नये, असा सल्ला देखील पाटील यांनी खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना दिला आहे. दुसऱ्यांदा आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केला. (Heamant Patil) एका गॅंगला आपल्याला जीवे मारण्याची ३ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे स्वत: खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

तसेच या संदर्भा जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी नांदेड येथील रिंधा गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप करत जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दोन दिवसापूर्वी एका फोनद्वारे आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्या फोनवरून खबऱ्याने त्यांना आपणास जीवे मारण्यासाठी ३ कोटी रुपयांची सुपारी देऊ केली असल्याचे जाधव यांनी म्हटले होते.

यामुळे एकच खळबळ उडालेली असतांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. हा प्रकार योग्य नाही, याचा निषेध केलाच पाहिजे. परंतु काही माणसं आपल्या जीवावर उठतात, तेव्हा आपण जे काम करतो, ते काम करत असतांना कोणी तरी आपल्या जीवावर उठेल असे करू नये. आपण समाजाचे नेतृत्व करत असतांना सगळ्यांना सोबत घेऊन चाललो, तर मला नाही वाटत कोणी अशा थराला जाईल, अशा शब्दात हेमंत पाटील यांनी खासदार जाधव यांना सल्ला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com