Mp Sanjay Jadhav News : नाव, चिन्ह मिळवले, जनाधाराचे काय ? मी शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत..

Parbhani : जे माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत, त्यांनी मी शपथपत्र दिले नसल्याचा पुरावा द्यावा.
Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, Parbhani
Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, ParbhaniSarkarnama

Marathwada : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोगाने निर्णय देवू नये, असे निर्देश दिलेले असतांना शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते हे आता वेगळ सांगण्याची गरज राहिलेली नाही. नाव, चिन्ह मिळाले पण जनाधाराचे काय? तो दबावाने मिळवता येत नाही, असे सांगतानाच मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केले.

Mp Sanjay Jadhav- Uddhav Thackeray News, Parbhani
Tanaji Sawant : खासदार-आमदाराच्या खांद्यावर हात ठेवत सावंतांचा इशारा ठाकरेंना की, राणा पाटलांना ?

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या खासदारांच्या यादीतील सहा पैकी दोघांनी शपथपत्र दिले नसल्याची चर्चा होती. यावरून संशयाची सुई संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्याकडे होती, याचा देखील जाधव यांनी खुलासा केला. (Parbhani) ज्यांच्याकडे मी शपथपत्र दिले नसल्याचे पुरावे असतील त्यांनी ते समोर आणावे, मी लगेच खासदारकीचा राजीनामा देईल, असे आव्हानही त्यांनी दिले.

संजय जाधव म्हणाले, शिंदे गटाला शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चिन्ह मिळाले नाही, तर केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने ते दिले आहे. मुंबई महापालिका निवडणुका पाहता शिंदेंना शिवसेना व धनुष्यबाण देवून त्याचा फायदा भाजपला उचलायचा आहे. पण नाव, चिन्ह मिळून काही होत नसते, जनतेच्या मनात स्थान असायला हवे. तुम्ही जनाधार कसा मिळवाल ?

कारण जे झालयं ते सामान्य जनतेला पटलेलं नाही, ते योग्यवेळी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. राहिला प्रश्न माझ्याबद्दल उपस्थितीत होत असलेल्या शंकेचा, तर आम्ही बाप बदलणारी औलाद नाही, आम्ही कालही उद्धव ठाकरेंसोबत होतो, आजही आहोत आणि उद्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहोत.जे माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत, त्यांना माझे आव्हान आहे, त्यांनी मी शपथपत्र दिले नसल्याचा पुरावा द्यावा, मी एका क्षणात खासदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिआव्हान देखील जाधव यांनी दिले.

नाव, चिन्ह गेले असले तरी परभणीच काय मराठवाड्यातील बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक कुठेच जाणार नाही. आमच्या जिल्ह्यातील जनता कायम बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी कायम उभी राहिलेली आहे. ज्या परभणी जिल्ह्याने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली, तो जिल्हा कधीही बेईमानी करणार नाही, असा विश्वास देखील जाधव यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com