योगी सरकार अन् तालिबान्यांमध्ये फरक फक्त दाढीचा !

खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

Yogi Adityanath,  Rajni Patil
Yogi Adityanath, Rajni Patil sarkarnama

औरंगाबाद : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ''देशातील तरुण, छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. अमेरिकी कंपनी ॲमेझॉनने देशाला आठ हजार ५४६ कोटी रुपये दिल्याचे कंपनीच्या रेकॉर्डवर आले आहे. देशातील व्यापारविषयक कायदे बदलण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली गेली,'' असा आरोप रजनी पाटील यांनी केला.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी घोषणा केली; पण ॲमेझॉन कंपनीने दिलेले आठ हजार ५४६ कोटी रुपये गेले कुठे? मोदी सरकारने लाच खाल्ली आणि खाऊही दिली,'' असा आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. ही रक्कम सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्यांना दिली गेली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी दोघांनी काल पत्रकार परिषदेत केली.


Yogi Adityanath,  Rajni Patil
रितेश- जेनेलिया रमले नाशिकच्या बाळ येशूच्या दारी!

रजनी पाटील म्हणाल्या, ''देशातील तरुण, छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. अमेरिकी कंपनी ॲमेझॉनने देशाला आठ हजार ५४६ कोटी रुपये दिल्याचे कंपनीच्या रेकॉर्डवर आले आहे. देशातील व्यापारविषयक कायदे बदलण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला. याविषयी सरकारने खुलासा करावा. ॲमेझॉन प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

रजनी पाटील म्हणाल्या की, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करत रजनी पाटील यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका केली. योगी आणि तालिबान्यांमध्ये काहीच फरक नाही. फरक असेल केवळ दाढीचा! ‘बेटी बचाव’चे नारे देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मुलीला अशी हीन वागणूक ते कसे देऊ शकतात? याचा आम्ही धिक्कार करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com