Mp Imtiaz Jalil News : जुना व्हिडिओ दाखवत एमआयएमने राज ठाकरेंना नामांतराच्या वादात ओढले..

MNS : यावरून आता पुन्हा एमआयएम-मनसे यांच्यास संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray News
Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray NewsSarkarnama

Aimim : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर यावरून सध्या जिल्ह्यात राजकारण सुरू आहे. नामांतरविरोधी कृतीसमिती स्थापन करत (Aimim) एमआयएमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेने एमआयएमला आव्हान देत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबवली. एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.

Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray News
Mp Sanjay Jadhav News : सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही..

असे असतांना आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे छत्रपती संभाजी महारा मुघलांना जावून मिळाले होते हा इतिहास आहे, असे सांगतांना दिसतात. या व्हिडिओचा आधार घेत इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नामांतराच्या विरोधावरून टीका करणाऱ्यांना जाब विचारला आहे.

इम्तियाज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कल्पना करा मी असे बोललो असते तर काय झाले असते...!! Hence what I say is..'इतिहास चांगला असो किंवा वाईट कसा ही असला तरी इतिहास असतो.' एमआयएमकडून औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर असून जो इतिहास आहे, तो मिटवता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

छत्रपती संभाजीनगर हे नाव भाजप व इतर पक्षांच्या घाणेरड्या राजकारणातून देण्यात आल्याचा आरोपही इम्तियाज यांनी केला आहे. आपला मुद्दा कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठीच आता इम्तियाज यांनी राज ठाकरे यांच्या जुन्या व्हिडिओचा आधार घेतला आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणत कधीकाळी भाजपवर तुटून पडणाऱ्या राज ठाकरेंचाच व्हिडिओ लावत एमआयएमने आता नामांतराला विरोध दर्शवण्यासाठी त्याचा आधार घेतला आहे. यावरून आता पुन्हा एमआयएम-मनसे यांच्यास संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in