MP Imtiaz Jaleel Allegation : भुमरे, बंब, बोरनारे कंत्राटदारांकडून कमिशन खातात..

AIMIM News : दुसऱ्या कंत्राटदाराने कामासाठी टेंडर भरले तर त्याला हातपाय तोडण्याची धमकी आमदाराकंडून दिली जाते.
Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel NewsSarkarnama

Aurangabad Political News : जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार हे आपल्या मतदारसंघातील कामे मी सांगेल त्याच कंत्राटदाराला मिळाली पाहिजेत, असा आग्रह धरतात. (Allegation News) कुणी ऐकलं नाही तर त्याला हातपाय तोडण्याची धमकी देतात, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.

Imtiaz Jaleel News
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

एवढेच नाही तर पैठणचे संदीपान भुमरे, गंगापूरचे प्रशांत बंब आणि वैजापूरचे रमेश बोरनारे हे कंत्राटदारांकडून पंधरा टक्के कमिशन खातात, असेही (Imtiaz Jaleel) इम्तियाज म्हणाले. या आरोपानंतर आता या तिघांकडून काय उत्तर मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Marathwada) मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १६ रोजी शहरात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.

या बैठकीच्या निमित्ताने २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत ५० हजार कोटींच्या कामांची घोषणा केली होती. (AIMIM) त्या घोषणांचे काय झाले? असा सवाल उपस्थीत करत मराठवाड्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. तसेच याची सीबीआयच्या विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणीही केली.

याचवेळी त्यांनी सत्ताधारी आमदार आपापल्या मतदारसंघातील कामे आपल्या ठेकेदाराला मिळावीत यासाठी हातपाय तोडण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप केला. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पैठणचे आमदार संदीपान भुमरे, गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची नावे घेत इम्तियाज यांनी त्यांच्यावर प्रत्येक कामात कंत्राटदाराकडून १५ टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला.

एखाद्या दुसऱ्या कंत्राटदाराने कामासाठी टेंडर भरले तर त्याला हातपाय तोडण्याची धमकी आमदाराकंडून दिली जाते. एकट्या वैजापूर मतदारसंघात साडेतीनशे कोटींची कामे केली जात आहेत. माझे आवाहन आहे, ज्याला कुणाला कामाचे कंत्राट घ्यायचे असेल त्याने टेंडर भरावे, त्याला कुणी धमकी दिली तर माझ्याकडे यावे, आम्ही बघून घेऊ, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला. इम्तियाज यांच्या आरोपानंतर आता जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता असून त्यांच्या या गंभीर आरोपांना भुमरे, बंब, बोरनारे उत्तर देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in