Mp Hemant Patil News : देवगिरी एक्स्प्रेसला चकचकीत बोगी माझ्यामुळेच..

Railway : येत्या १३ फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला सर्व सुविधायुक्त नवे एलएचबी डब्बे जोडले जाणार.
Mp Hemant Patil-Ashok Chavan News, Aurangabad
Mp Hemant Patil-Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

Nannded : नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसला चकचकीत डब्यांची बोगी जोडल्याबद्दल माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले होते. नांदेडहून जाणाऱ्या प्रवशांची गैरसोय दूर व्हावी, त्यांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी चांगल्या सीटची बोगी देण्याची मागणी आपण दानवे यांच्याकडे केली होती.

Mp Hemant Patil-Ashok Chavan News, Aurangabad
Anti Corruption News : कंत्राटदाराचे बील काढण्यासाठी साडेआठ लाख मागितले आणि एसीबीने पकडले..

त्यांनी स्वतः फोन करून ही मागणी मान्य केल्याचा फोन मला केल्याचे ट्विट अशोक चव्हाणांनी केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी आपल्यामुळेच देवगिरी एक्स्प्रेसला चकचकीत बोगी जोडण्यात आल्याचा दावा केला. हेमंत पाटील म्हणाले, रेल्वेतील स्वच्छता, पाण्याचा प्रश्न या संदर्भात तीन दिवसांपुर्वीच आपण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली होती.

त्यानंतर नवी बोगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे प्रश्नावर आपण सातत्याने प्रश्न उपस्थीत केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये घनसावंगी येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त करत मागण्या केल्या होत्या.

त्यापैकीच एक मागणी होती मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे अत्यंत खराब असल्याने नवीन डबे देण्यात यावेत. दानवे यांनी चव्हाणांच्या या मागणीची दखल घेतली आणि त्यानुसार येत्या १३ फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला सर्व सुविधायुक्त नवे एलएचबी डब्बे जोडले जाणार असल्याचे सांगितले.

रावसाहेब दानवे यांनी फोन करून हे आपल्याला कळवल्याचे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले काल केले होते. त्यानंतर आता याचे श्रेय आपलेच असल्याचे सांगत शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com