Mp Gajanan Kirtikar On Ajit Pawar : काही आमदार घेवून अजित पवार बाहेर पडत असतील तर त्यांचे स्वागतच...

Shivsena : इतरांप्रमाणे आपणही ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलो. खोक्यासाठी किंवा मंत्रिपदाच्या लालसेपोटी आपण हे केलेले नाही.
Mp Gajanan Kirtikar On Ajit Pawar
Mp Gajanan Kirtikar On Ajit PawarSarkarnama

Jalna News : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांना सोबत घेत भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. भाजपसोबत पहाटेचा शपथविधी करून अजित पवारांनी हा प्रयोग या पुर्वी केला आहे. आता पुन्हा ते काही आमदार घेवून भाजपसोबत बाहेर पडणार असतील तर त्यांचे स्वागतच करू, अशी भूमिका शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी घेतली.

Mp Gajanan Kirtikar On Ajit Pawar
Paithan Market Committee News : मंत्री भुमरे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी लागली कामाला..

जालना येथे अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार (Ajit Pawar) जरी भाजपसोबत गेले तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत असणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये अजित पवारांच्या भूमिकेविषयी एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) म्हणाले, आमच्यावर गद्दारीचा आरोप केला जातो, परंतु आम्ही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत, हे वारंवार स्पष्ट केले आहे. (Shivsena) त्यामुळे कोण काय टीका करतं याकडे आता आम्ही लक्ष देत नाही. खासदार संजय राऊत म्हणजे आता मनोरंजनाचा विषय झाला असून त्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांच्या ठाकरे सरकारमधील वाढत्या हस्तक्षेपामुळे इतर नेते मंडळींची घुमसट होत होती. याविषयी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे इतरांप्रमाणे आपणही ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलो. खोक्यासाठी किंवा मंत्रिपदाच्या लालसेपोटी आपण हे केलेले नाही, तर हिंदुत्वासाठी शिंदे गटात सामील झालो.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत पहाटेचा शपथविधी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग एकदा केला आहे. तीच भूमिका ते परत घेणार असतील, राष्ट्रवादीपासून अजित पवार यांचासारखा नेता काही आमदारांना घेऊन बाहेर पडत असेल, तर त्यांचे स्वागत करूस असेही कीर्तिकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com