मोदीजी तुम्ही बोफोर्स तोफे पेक्षाही जास्त फेकता, पंतप्रधान आवास योजनेवरून एमआयएमची टीका..

मला पुन्हा आशिर्वाद दिला तर मी एकही कुटुंब २०२२ म्हणजे स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षात स्वतःच्या घराशिवाय राहू देणार नाही. प्रत्येक नागरिकांना सर्व सोयींनी युक्त असे पक्के घर देईल. ( Mp Imtiaz Jalil)
Mp Imtiaz jalil-Pm Narendra Modi News, Aurangabad
Mp Imtiaz jalil-Pm Narendra Modi News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : तुम्ही मला आशिर्वाद दिले तर स्वंतत्र भारताच्या ७५ व्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये प्रत्येकाला राहण्यासाठी पक्के घर, ज्याची छत देखील पक्की असेल, त्यात नळ, त्यात जल, वीज, गॅस कनेक्शन, एलईडी बल्ब अशा सगळ्या सुविधा असतील असा दावा (Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या एका प्रचार सभेत केला होता.

सध्या २०२२ सुरू आहे, मोदी हेच पंतप्रधान आहेत, परंतु प्रत्येकाला घर देण्याचा त्यांचा दावा फोल ठरला, अशी टीका करत (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी तुम्ही तर बोफोर्स तोफेपेक्षा जास्त लांब फेकता, असा टोला ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

इम्तियाज जलील यांनी मोदींचा तो व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला बहुमत दिले आणि मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. २०१४ मध्ये अच्छे दिनचे तर २०१९ मध्ये सबका साथ सबका विकासचे स्वप्न दाखवत मोदींनी सत्ता मिळवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत बोलतांना मोदींनी मतदारांना आवाहन केले होते.

मला पुन्हा आशिर्वाद दिला तर मी एकही कुटुंब २०२२ म्हणजे स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षात स्वतःच्या घराशिवाय राहू देणार नाही. प्रत्येक नागरिकांना सर्व सोयींनी युक्त असे पक्के घर देईल, असे आश्वासन दिले होते. काॅंग्रेसच्या घरासारख्या फक्त चार भिंती नाही, तर वीज, गॅस, लाईट, शौचालय, पक्की छत असलेले घर हे माझे स्वप्न आहे.

Mp Imtiaz jalil-Pm Narendra Modi News, Aurangabad
अविनाश भोसले, संजय छाब्रियांच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ED ची टाच

नेमंक यावरच खासदार इम्तियाज जलील यांनी बोट ठेवत मोदींच्या सभेतील तो व्हिडिओ ट्विट करत टोला लगावला आहे. मोदींच्या या आश्वासनांची तुलना त्यांनी थेट बोफोर्स तोफेच्या माऱ्याच्या क्षमतेशी केली आहे. बोफोर्स तोफेतील गोळा जितक्या लांब जाऊ शकत नाही, तितके लांब मोदींचे खोटे आश्वासन असते, असा टोला इम्तियाज यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in