मोदीजी आता अंबाजोगाईत भाजपचा एकही नगरसेवक येणार नाही हे आव्हान स्वीकारा

( Jugalkishor Modi Join Ncp)पापा मोदी आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आले आहेत, त्यामुळे अंबाजाोगाई नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणणे कठीण नाही. मोदी यांची तेवढी ताकद नक्कीच आहे.
Dhnanjay Munde- Modi
Dhnanjay Munde- ModiSarkarnama

औरंगाबाद ः बीड जिल्ह्यात काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलला आणि ती यादी बदलली तेव्हाच लक्षात आलं होतं की पापा मोदी काही आता काॅंग्रेसमध्ये राहत नाहीत. आज ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्या व इतर सहकाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल. काॅंग्रेसमध्ये मिळालं त्यापेक्षा कितीतरी पट इथे मिळेल, असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना दिला. यानंतर अंबाजोगाई नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक येणार नाही, हे आव्हान आजच्या प्रवेशानिमित्त स्वीकारा, असे आवाहन देखील मुंडे यांनी मोदींना केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जुगलकिशोर उर्फ पापा मोदी यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करतांना धनंजय मुंडे यांनी नवा-जुना असा वाद न करता सर्वांचा योग्य सन्मान राखला जाईल असेही स्पष्ट केले.

या पक्ष प्रेवश सोहळ्या प्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे होकायंत्र म्हणून अंबाजोगाईकडे पाहिले जाते. इथे घडलेल्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम हा जिल्ह्याच्या राजकारणावर होत असतो. पापा मोदी आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आले आहेत, त्यामुळे अंबाजाोगाई नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणणे कठीण नाही. मोदी यांची तेवढी ताकद नक्कीच आहे.

नगर परिषदेप्रमाणेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला केज मतदारसंघात देखील राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणायचा आहे, हे आव्हान मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने स्वीकारावे. काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी बदलले गेले. ती यादी पाहिली तेव्हाच लक्षात आलं होतं की मोदी आता जास्त दिवस काॅंग्रेसमध्ये राहत नाही. आज त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे.

Dhnanjay Munde- Modi
काँग्रेसला धक्का; नगराध्यक्ष मोदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ते पक्षात आल्याने आता अनेक जुन्यांना प्रश्न पडला असेली की आमचे काय? पण चिंता करायचे काम नाही, मी ही आता पक्षात जुना झालो आहे. पण तरीही मला शरद पवार साहेब, अजित दादा यांनी सगंळ दिलं. इथे जुना नवा असा वाद नसतो.

पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना काॅंग्रेसमध्ये मिळाले त्यापेक्षा अधिक इथे मिळेल. जुन्यांचा देखील योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. पण येणाऱ्या अंबाजोगाई नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, हे आव्हान स्वाकारून इथून जिल्ह्यात जा, असे आवाहन देखील मुंडे यांनी यावेळी केले.

केज मतदारसंघातून मुंदडा यांना सर्वात आधी उमेदवारी जाहीर झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतच शरद पवार साहेबांनी विधानसभेची पहिली उमेदवारी मुंदडा यांना जाहीर केली होती. पण शेवटपर्यंत त्यांनी आपल्याला धोक्यात ठवले आणि ऐनवेळी भाजपकडून लढल्या.

आपण पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली, पण ते पराभूत झाले. आपण गाफील राहिलो. पण आता ही चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येणार, हा शब्द या निमित्ताने आपण सगळे देऊ, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com