शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे मोदी झुकले; आता तरी केंद्राला सुबुद्धी येऊ दे

(Shivsena Mp OmprakashRaje Nimbalkar) देशाची घटना बदलू पाहण्याची मनिषा घेऊन वाटचाल करणाऱ्यांना या देशाचा इतिहास कदाचित कळलेला दिसत नाही. यातुन तरी त्यांना सुबुध्दी येईल,
शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे मोदी झुकले; आता तरी केंद्राला सुबुद्धी येऊ दे
Pm Modi-Mp Omprakashraje NimabalkarSarkarnama

उस्मानाबाद ः गेल्या कित्येक महिन्यापासुन थंडी,ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता देशाच्या राजधानीच्या सीमेवमेवर ठाण मांडून केंद्राच्या कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज मोठा विजय झाला आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत होते. आज त्यांच्या संघर्षाचा विजय झाला, असेही निंबाळकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली.

त्यानंतर ओमराजे निंबाळकर म्हणाले, केंद्राने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे आणले, विना चर्चा मंजुर करुन घेतले, पण हा देश फक्त बहुमताच्या जोरावर चालत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासुन केंद्राच्या विरोधात आंदोलन करुन चर्चेची मागणी केली, पण केंद्र सरकार त्यांच्या भुमिकेवरुन हटायला तयार नव्हते.

एवढेच नाहीतर शेतकऱ्यांना चिरडुन आंदोलन दडपण्याचा दुर्देवी प्रकार या देशाने पाहिला,शेतकऱ्यांची एकजुट व त्यांचा संघर्ष कायम राहिला अन् त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या निर्णयापासुन मागे यावे लागले.

याविरोधात महाविकास आघाडी सरकारने देखील बंद पुकारुन व वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करुन शेतकऱ्यांच्या बाजुने शक्ती उभा केली होती. देशाची घटना बदलू पाहण्याची मनिषा घेऊन वाटचाल करणाऱ्यांना या देशाचा इतिहास कदाचित कळलेला दिसत नाही. यातुन तरी त्यांना सुबुध्दी येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Pm Modi-Mp Omprakashraje Nimabalkar
तोंडावर निवडणुका, अहंकाराची किंमत चुकवावी लागेल; म्हणून मोदी नमले…

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in