MNS : चिल्लर संघटनांकडे आम्ही लक्ष देत नाही, राजसाहेबांची सभा दणक्यात होणारच..

विरोध करणाऱ्यांनी विरोध करून दाखवावा, आमच्यात किती दम आहे ते आम्ही दाखवून देऊ असा इशाराही धोत्रे यांनी यावेळी दिला. (MNS)
MNS : चिल्लर संघटनांकडे आम्ही लक्ष देत नाही, राजसाहेबांची सभा दणक्यात होणारच..
Dilip Dhotre-Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. (MNS) चिल्लर संघटनांना कितीही विरोध करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी विरोध करणाऱ्या संघटनांना सुनावले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक येतील, असा दावा देखील त्यांनी केला. (Marathwada)

राज ठाकरे यांच्या सभेच्या पुर्वतयारीसाठी आज मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे, प्रकाश महाजन यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून धोत्रे व मनसेचे पदाधिकारी आज प्रत्यक्ष जाऊन मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची पाहणी करणार आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना धोत्रे म्हणाले, औरंगाबाद मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाच्या बैठक आज पार पडली. आतापर्यंत कोणाचीही झाली नसेल एवढी प्रचंड जाहीर सभा राज साहेबांची होईल. सभेला अनेक चिल्लर संघटना विरोध करत आहेत, पोलिस आयुक्तांना निवदेन देत आहेत, पण अशा चिल्लर संघटनाकडे आम्ही लक्ष देत नाही.

Dilip Dhotre-Raj Thackeray
AIMIM : राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएमच्या `हाताची घडी तोंडावर बोट`चे रहस्य काय ?

विरोध करणाऱ्यांनी विरोध करून दाखवावा, आमच्यात किती दम आहे ते आम्ही दाखवून देऊ असा इशाराही धोत्रे यांनी यावेळी दिला. आजच्या बैठकीत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली असून १ लाखा पेक्षा जास्त लोक सभेला येतील, असा दावा देखील त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.