MNS : पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरूवात ; महिलांनी हंड्यात टाकले मुख्यमंत्र्यांसाठी पत्र..

नागरिकांनी देखील या यात्रेला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांसाठी पत्र लिहून देत आपला राग व्यक्त केला. (MNS)
MNS : पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरूवात ; महिलांनी हंड्यात टाकले मुख्यमंत्र्यांसाठी पत्र..
MNS Water issue Rally In AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शहराला आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा व त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल यावरून सध्या राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. (MNS) महापालिकेत सर्वाधिक काळ सत्ता असलेल्या शिवसेनेला व तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या भाजपने देखील पाणी प्रश्नाला भाजपच जबाबदार असल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले आहे. (Aurangabad) यात मनसेनेही उडी घेतली असून आजपासून शहरात पाणी संघर्ष यात्रा सुरू केली आहे.

हडको भागातील पवननगर येथून या संघर्ष यात्रेला सुरूवात झाली असून मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्याठी नागरिकांकडून पत्र देखील लिहून घेतले जात आहेत. (Water Supply ) महिला मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र रिकाम्या हंड्यात टाकत आहेत. नागरिकांकडून २५ हजार पत्र लिहून घेऊन ती मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.

पाणी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या विरोधकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण आता या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून चढाओढ सुरू आहे. पाणी प्रश्नावरून संघर्ष यात्रा काढणाऱ्या मनसेने सिडको-हडको भागातून या आंदोलनाला सुरूवात केली.

MNS Water issue Rally In Aurangabad
Aurangabad : धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती शिवसेना-भाजपने एकत्र फुगडी घालत साजरी केली..

नागरिकांनी देखील या यात्रेला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांसाठी पत्र लिहून देत आपला राग व्यक्त केला. येत्या २३ मे रोजी पाणी प्रश्नावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पुर्वीच मनसेने संघर्ष यात्रा काढून शहरवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.