MNS : पारा बेचाळीस अंशावर, तरी मनसैनिक राजसभेसाठी मैदानात दाखल

राज यांच्या सभेला पोलिसांच्या परवानगी पासून ते तयारीपर्यंत अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. तब्बल १६ अटी पोलिसांनी या सभेसाठी घातल्या आहेत. (MNS)
MNS : पारा बेचाळीस अंशावर, तरी मनसैनिक राजसभेसाठी मैदानात दाखल
MNS Chief Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या सभेला अवघे दोन-अडीच तास शिल्लक आहेत. पण या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर दाखल व्हायला सुरूवात झाली ती दुपारी साडेतीन ते चार वाजेपासून. (MNS) सध्या राज्यात उष्णतेची लाट आहे, शहरातील तापमान देखील ४२ अंशावर असते. (Raj Thackeray) अशा रखरखत्या उन्हात मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर प्रवेश मिळवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते रांगेत उभे होते. (Aurangabad)

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि तपासणीला सामोरे जात मनसैनिक उत्साहाने राज ठाकरे व मनसेच्या घोषणा देत सभास्थळी पोहचत आहेत. गुडीपाडव्याच्या शिवाजी पार्कवरील सभेनंतर राज्यातील वातावरणच बदलून गेले होते. राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेतला आणि त्याला महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर ठाण्यात देखील राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेतली आणि अधिक आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर पुण्यात त्यांनी औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा आणि ५ जून रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. राज यांच्या सभेला पोलिसांच्या परवानगी पासून ते तयारीपर्यंत अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. तब्बल १६ अटी पोलिसांनी या सभेसाठी घातल्या आहेत.

MNS Chief Raj Thackeray
Shivsena : भाजपकडून सुपारी घेऊन होणाऱ्या सभेने शिवसेनेचा गड हलणार नाही..

या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसतोय. राज्यभरातून हातात पोस्टर आणि मनसेचे झेंडे घेऊन तरूण दाखल झाले आहेत. देशभरातून वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी देखील या सभेच्या वार्तांकनासाठी दाखल झाल्याचे चित्र आहे.

या सभेसाठी राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अभिजीत पानसे यांच्यासह सर्वच नेते व पदाधिकारी कालच औरंगाबादेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते मनसे आणि राज ठाकरेंवर तुटून पडले आहेत. आता ते आपल्या भाषणातून त्याला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.