पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेने राज ठाकरे संतापले अन् मनसैनिकांची पीएफआय कार्यालयावर धडक..

शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह काही कार्यकर्ते किराडपुरा भागात पीएफआयच्या कार्यालाच्या दिशेने घोषणबाजी करत निघाले होते. (MNS Aurangabad)
MNS Attack On PFI Office In Aurangabad News
MNS Attack On PFI Office In Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : देशभरासह महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात एटीएस आणि ईडीने एकाचवेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाडी टाकत राज्यातून २० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक केली होती. (MNS) दहशतवादी पीएफआय संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

या कारवाईच्या विरोधात पुण्यात मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. (Aurangabad) त्यात काहीजणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप केला गेला. या घटनेवेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

राज ठाकरे यांनी तर देशात व महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा देण्याचे प्रकार खपवून घेता कामा नये, अशा शब्दात संताप व्यक्त केला होता. तसेच जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगाबादेतील मनसैनिकांनी आज थेट पीएफआय संघटनेच्या किराडपुरा भागातील कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

MNS Attack On PFI Office In Aurangabad News
आठवलेंची डबल ढोलकी : ‘बारामतीत पवारांचा पराभव नको; पण भाजपचा विजय हवा’

मनसेच्या पाच कार्यकर्त्यांनी या भागात धडक देत घोषणबाजी करत कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या पाचही मनसैनिकांना ताब्यात घेतले.मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह काही कार्यकर्ते किराडपुरा भागात पीएफआयच्या कार्यालाच्या दिशेने घोषणबाजी करत निघाले होते. परंतु पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून झेंडे, काळा रंग व इतर साहित्य जप्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com