MNS : `राज`,सभेसाठी `मनसे` तयारी, पण पोलिस परवानगीचे काय ?

राज सभेसाठी फक्त औंरगाबादेतूनच नाही तर मराठवाड्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक येणार असल्याची माहिती आहे. (MNS)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मशिदीवरील भोंग्याचा विषय घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात रणशिंग फुंकले आहे. १ मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे सभा घेणार आहेत. (MNS) या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. पोलिसांच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर परवानगीची वाट न पाहता मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर व्यासपीठ उभारण्याच्या कामाचे काल पूजनही केले.

घरोघरी जाऊन राजसेभेचे निमंत्रण, रॅली काढून सर्वसामान्यांना सभेला येण्याची विनंती करत मनसेने या सभेची वातावरण निर्मिती जोरात केली आहे. (Raj Thackeray) शहरात ठिकठिकाणी राजसभेचे भव्य पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. (Aurangabad) सभेला अवघे सहा दिवस राहिले असतांना पोलिसांकडून मात्र या सभेच्या परवानगीसाठी अद्यापही कुठल्याच हालचाली होतांना दिसत नाहीयेत.

त्यामुळे मनसेने देखील परवानगी मिळो अथवा न मिळो, सभा तर होणारच, असा निर्धार करत तयारी सुरू केली आहे. मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊन व्यासपीठ उभारणीच्या कामाचे विधिवत पूजन केले.

राज सभेसाठी फक्त औंरगाबादेतूनच नाही तर मराठवाड्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक येणार असल्याची माहिती आहे. येत्या एक-दोन दिवसांत मुंबईतील मनसेचे प्रमुख नेते देखील औंरगाबादेत येणार असल्याचे समजते. त्यामुळे सभेची तारीख जसजशी जवळ येईल तसे मनसेकडून शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे.

MNS Chief Raj Thackeray
Congress : `कुठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा`ला, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा`, ने प्रत्युत्तर..

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आजपर्यंत झालेल्या सगळ्या सभांचे रेकाॅर्ड मोडण्याचे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेवून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सभेच्या परवानगीच्या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com