MNS : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मिळणार ५४ रुपये लिटर दराने पेट्रोल..

शहरातील क्रांतीचौक येथील पेट्रोल पंपावर सकाळी ८ ते ९ या एका तासात ५४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलचे वाटप सर्वसामान्यांना केले जाणार आहे. (MNS, Aurangabad)
Mns Chief Raj Thackeray Birthday News
Mns Chief Raj Thackeray Birthday NewsSarkarnama

औरंगाबाद : देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. अशावेळी एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या पक्षाकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रयत्न औरंगाबादेत (Aurnagabad) मनसेच्या वतीने केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ५४ वा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. या निमित्ताने औरंगाबाद मनसेच्या वतीने सकाळी ८ ते ९ या एक तासात शहरातील एका पेट्रोल पंपावर चक्क ५४ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोलचे वाटप करण्यात येणार आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या पेट्रोल ११३ रुपये प्रति लिटर आहे, मनसेने एक तासासाठी का होईना निम्या दरात पेट्रोल देण्याचा निर्णय घेतल्याने उद्या क्रांतीचौक पेट्रोल पंपावर मोठी रांग लागणार एवढे मात्र निश्चित. मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या (ता.१४) रोजी ५४ वा वाढदिवस आहे.

कोरोना आणि त्यानंतर आता शस्त्रक्रिया करावयाची असल्यामुळे राज ठाकरे यांनी उद्या कुणीही भेटण्यासाठी येऊ नये असे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील मनसेच्या वतीने महागाईच्या या भडक्यात थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Mns Chief Raj Thackeray Birthday News
Latur : `चला आमच्यासोबत विधानसभेत`, राष्ट्रवादीच्या पाटलांची काॅंग्रेसच्या अशोकरावांना साद

राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस असल्याने नागरिकांना पेट्रोलचे वाटप देखील ५४ रुपये प्रतिलिटर दराने करण्याचा उपक्रम मनसेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. शहरातील क्रांतीचौक येथील पेट्रोल पंपावर सकाळी ८ ते ९ या एका तासात ५४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलचे वाटप सर्वसामान्यांना केले जाणार आहे. आता या संधीचा लाभ किती नागरिक घेतात हे उद्याच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com