Mns News : राज ठाकरे उद्या परळी कोर्टात हजर होणार...

Raj Thackeray : बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎
Mns Chief Raj Thackeray News, Aurangabad
Mns Chief Raj Thackeray News, AurangabadSarkarnama

Marathwada News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या, सकाळी हेलिकाॅप्टरने परळीत येणार आहेत. परळी कोर्टात ते हजर होणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ (MNS) मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

Mns Chief Raj Thackeray News, Aurangabad
G-20 Conference : तीन आठवड्यात सगळी कामे पुर्ण करा, हलगर्जीपणा सहन करणार नाही...

त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी ते उद्या (Parli) परळी कोर्टात हजर होणार आहेत. हेलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे ते येणार आहेत. (Raj Thackeray) त्यानंतर परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता ते परत मुंबईला रवाना होणार होतील.

२००८ मध्ये मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎

पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, उद्या सकाळी ते परळी न्यायालयात हजर होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in