MNS News : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मनसे काढणार मोर्चा..

Marathwada : छत्रपती संभाजीनगर मधील लाखो लोकांनी आपली समर्थन पत्रे त्वरित जमा करावीत
MNS News, Chhatrapati Sambhajinagar
MNS News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. परंतू या आनंदावर काही लोक विरजण घालण्याचे काम करत आहेत. त्यांनी कुठलेही कारण नसतांना छत्रपती संभाजीनगर नावास विरोध केला आहे. (MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

MNS News, Chhatrapati Sambhajinagar
Pravin Darekar News : गरिबांच्या स्प्नांचे इमले उभारणारे बजेट, पण विरोधक डोळे असून आंधळे..

त्यानुसार ज्या प्रमाणे विरोध होईल त्याच प्रमाणे उत्तर देण्यात येईल हे सांगण्यात आले होते. आता छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावे ही इथल्या जनतेची आणि मनसेची इच्छा स्वप्न होते.(Marathwada) ते स्वप्न सत्यात उतरल्यामुळे येत्या १६ मार्च रोजी मनसेच्या वतीने शहरातून स्वप्नपुर्ती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अनेक दशकांपासूनचे स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचे पूर्ण झाले असून त्या सर्व लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने `स्वप्नपूर्ती रॅली` काढणार आहे. तसेच सर्व नागरिक नामांतराला आपले समर्थन असल्याचे पत्र घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाणार आहेत. ही रॅली प्रचंड मोठी होणार असून याद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हजारो समर्थन पत्रके सरकार दरबारी पोहचवणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील लाखो लोकांनी आपली समर्थन पत्रे त्वरित जमा करावीत, असे आवाहन देखील मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. १६ मार्च गुरुवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता समर्थन रॅलीला संस्थान गणपती येथून सुरूवात होणार आहे. यावेळी हजारो पत्रके आणि समर्थन पत्र मनसे विभागीय आयुक्तांना देणार आहे.

पत्रकार परिषदेस पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे,सरचिटणीस संतोष नागरगोजे,अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी,जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर,दिलीप बनकर पाटील,वैभव मिटकर,बीपिन नाईक,गजन गौडा पाटील,अनिकेत निल्ल्लावार,प्रशांत जोशी,संकेत शेटे,नागेश तूसे,अशोक पवार,राहुल पाटील,विक्रम सिंग परदेसी,मनीष जोगदंड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com