वर्षानुवर्षे दिमाखात मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांचा `मनसे`, सत्कार

काल मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांत नामफलक लावणे सक्तीचे करण्यात आले. (MNS Aurangabad)
Mns Aurangabad
Mns AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मराठी अस्मिता आणि मातृभाषेचा आग्रह धरत कायम आक्रमक राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज औरंगाबादकारांना (Aurangabad) सुखद धक्का दिला. महाराष्ट्रात दुकानदार, व्यापारी, उद्योजक आणि मोठ्या आस्थापनांनी आपल्या पाट्या मराठीतच लावाव्यात यासाठी मनसेने (MNS) मुंबईसह राज्यभरात आंदोलने केली. (Raj Thackeray) काही प्रमाणात या आंदोलनाला यश देखील आले, पण या पाट्या आंदोलनापुरत्याच दिसायच्या.

काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठी पाट्यांसदर्भात निर्णय झाला आणि या विषयाची चर्चा पुन्हा सुरू झाली. कुठल्याही सक्ती किंवा आंदोलनाच्या भितीपोटी नाही तर मराठी आणि मातृभाषेवरील प्रेमापोटी अनेक व्यापारी, उद्योजक, छोटो-मोठे दुकानदार यांनी मराठीतून पाट्या लावलेल्या आहेत. अशा साठहून अधिक व्यापाऱ्यांचा आज मनसेच्या वतीने गौरव, सत्कार करण्यात आला.

मनसेच्या वतीने या दुकानदारांचा शाल, पुष्पगुच्छ व राज ठाकरे यांचे छायाचित्र आणि मराठी पाट्यांबद्दलची भूमिका विषद करणारे पत्र संबंधितांना देण्यात आले. नहेमीच खळखट्याकची भाषा करणाऱ्या मनसेकडून अशा प्रकारचा सत्कार, गौरव झाल्याने व्यापारीही सुखावले होते. काल मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांत नामफलक लावणे सक्तीचे करण्यात आले.

या निर्णयानतर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असल्याचे मनसेने म्हटले आहे. मनसे तर्फे सातत्याने मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले गेले,अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झाले. उशीरा का होईना मराठीला न्याय मिळाला याचा आनंद असल्याचेही मनसेने म्हटले आहे.

Mns Aurangabad
भाजपमधून बाहेर पडताच नेत्याची भविष्यवाणी :राधाकृष्ण विखे होणार नवे प्रदेशाध्यक्ष

या निमित्ताने वर्षानुवर्ष मराठीतून पाट्या लावणाऱ्या शहरातील पीरबाजार या बाजारपेठतील ६४ दुकानदारांचा गौरव व अभिनंदन मनसेच्या वतीने करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, शहराध्यक्ष गजन पाटील,आशिष सुरडकर,अविनाश पोफळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in