औरंगाबादमध्ये जमावबंदी; राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर

Raj Thackeray | Aurangabad | MNS : मनसेला मोठा धक्का
MNS| Raj Thackeray|
MNS| Raj Thackeray| Sarkarnama

औरंगाबाद : ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा आणि पुण्यात (Pune) हनुमानाची महाआरती यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangaabad) जाहीर सभा घेणार आहेत. मात्र सभेला ५ दिवस बाकी असतानाही अद्याप पोलिसांची अद्याप परवानगी मिळालेली नाही. यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या सभेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर आहे.

कारण औरंगाबादमध्ये पुढील १३ दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू झाला आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. या आदेशानुसार, शहरामध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असणार आहे. आगामी दिवसांमधील सण-वार आणि राज ठाकरे यांच्या नियोजीत सभेला असलेला राजकीय पक्षांचा विरोध यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.

टीझर लॉंच :

पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळाली नसली तरी १ मे च्या सभेसाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. मी धर्मांध नाही, मी धर्म अभिमानी आहे असे म्हणतं राज ठाकरेंच्या या नियोजीत सभेचा वादळी टिझर रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टिझरमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतर करण्याच्या मुद्द्याला मनसे हात घालणार असल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in