`आमदार सुरेश धस यांचा एक हजार कोटींचा जमीन घोटाळा`

माजी मंत्री सुरेध धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. अनेक देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचा दावा करण्यात आला आहे.
Mla Suresh Dhas
Mla Suresh DhasSarkarnama

औरंगाबाद : बीड जिल्ह्यात हिंदू देवस्थान, वक्फ बोर्डासह इतर इनामी जमिनी हडपण्यात आल्या आहेत. साधरणता दोनशे हेक्टर इनामी जमिनीचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) व त्यांच्या ताब्यात असलेली बँक, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांचा देखील सहभाग असल्याचा खळबजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे व शेख अब्दुल गणी यांनी केला.

बुधवारी (ता.८) पत्रकार परिषद घेऊन या दोघांनी या संदर्भात सविस्तर माहिती देत ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये इनामी जमिनीचे कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाले आहेत. याच संदर्भात औरंगाबादेत विधीज्ञॲअसीम सरोदे यांच्या उपस्थिती खाडे यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यासह इतरांवर आरोप केले.

राम खाडे म्हणाले, बीड जिल्ह्यात हिंदू देवस्थाने, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे गैरव्यवहार करण्यात आले आहेत. यात खर्डा येथील विठोबा देवस्थानची ४२ एकर जमीन, आष्टी येथील पिंपळेश्‍वर महादेव संस्थान,१८ एकर, श्री. विरुपाक्ष स्वामी गुरु श्री.गिरीस्वामी मठ ,मानूर १७ ते १८ एकर, चिंचपूर दर्गा (हिंदू आणि मुस्लिमांची १२० एकर जमिनीत गैरव्यवहार झाले आहेत.

या विषयी आम्हीे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. याच संदर्भात दोन ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. २०२० मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात तत्कालीन प्रभारी उपजिल्हाधिकारी (भुसाधार) एन.आर. शेळके यांनी इनामी जमिनी कायदा हातात घेऊन खालसा केल्या आहेत. इनाम जमीन हे स्टेट्स आधी रद्द केले. विशेष म्हणजे शेळके यांनी रजेवर असताना त्यावर स्वाक्षऱ्यावर केल्या आहेत.

दुसरे तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भुसूधार) प्रकाश आघाव पाटील यांनीही बेकायदेशीररीत्या त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करीत भोगवटा वर्ग-२ च्या जमीनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याचा आदेश पारित केला. यात त्यांना दोषी मानून राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. त्यात २०१८च्या तारखा टाकून या जमीनी सुरेश धस यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या नावावर करण्यात आल्याचा दावा देखील खाडे यांनी केला.

Mla Suresh Dhas
रस्ते कामातील भ्रष्टाचाराचे फेसबुक लाईव्ह सुरू असतांनाच मंत्री भुमरेंच्या भावाकडून हल्ला

यातील काही जमिनीचे प्लॉटिंग पाडून त्या विकण्यात आल्या आहेत. यासाठी धस अध्यक्ष असलेल्या मच्छिंद्र मल्टीस्टेट बँकेतर्फे कर्जही देण्यात आले. या प्रकरणात सामूहिकरीत्या भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचेही खाडे म्हणाले. तसेच या घोटाळ्यात आमदार धस यांच्या पत्नी, तसेच नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

इर्शान नवाब खान, अस्लम नवाब खान, मनोज उर्फ मुन्ना रत्नपारखी, रोहित मिलन जोशी, हनुमंत जंजिरे, हरिभाऊ धोंडिबा खेडकर व खरेदी खतावर अन्य साथीदारांचा समावेश असल्याचेही खाडे आणि गणी यांनी सांगितले. अशा भ्रष्टाचाराविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे, याबाबत ईडीची चौकशी व्हावी, भ्रष्टाचाराविरोधात सर्व राजकीय पक्षांनी भूमिका घेत अशा भ्रष्टाचाऱ्यांना बाहेर काढावे, असे असीम सरोदे म्हणाले.

या सर्व आरोपांवर धस यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्यात येत असून त्यांचे म्हणणे येताच ते वेबसाईटवर अपलोड केले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com