Grampanchayat Election In Aurangabad District News
Grampanchayat Election In Aurangabad District NewsSarkarnama

आमदार शिरसाटांची प्रतिष्ठा पणाला, एका ग्रामपंचायतीसाठी सगळ्या पक्षाचे नेते मैदानात..

चौरंगी लढत होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mla Sanjay Shirsat)

औरंगाबाद : बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्वाची असलेल्या वडगांव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपचंयात निवडणुक येत्या ४ आॅगस्ट रोजी होत आहे. (Shivsena) शिवसेनेत असतांना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व होते. गेल्यावेळी १७ पैकी १६ सदस्य हे शिरसाट यांच्या पॅनलचे विजयी झाले होते, तर एकमेव जागा भाजपला मिळाली होती.

४७ हजार मतदार असलेली ही मोठी ग्रापंचायत असून औद्योगिक क्षेत्राचा बराच भाग या अतंर्गत येत असल्याने ती महत्वाची मानली जाते. (Aurangabad) राज्यात नुकत्याच घडलेल्या घडामोडी, त्यात आमदार संजय शिरसाट यांनी केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, शिंदेगट, भाजप व इतर अशी चौरंगी लढत यावेळी होतांना दिसते आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारावर जोर दिला आहे. संजय शिरसाट यांनी शिंदे गटात जात बंडखोरी केल्यानंतरची त्यांच्या मतदारसंघातील ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तर तिकडे शिरसाट यांना धडा शिकवण्यासाठी आतापर्यंत या ग्रामपंचयात निवडणुकीत फारसा रस न दाखवणारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरै, आमदार अंबादास दानवे व नवनियुक्त तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड आदींनी लक्ष घालत प्रचारात झोकून दिले आहे. तर संजय शिरसाट यांच्यावतीने त्यांच्या मुलगा, पत्नी आणि मुलीने प्रचाराची धुरा सांभाळली आहे. शेवटच्या टप्यात संजय शिरसाट हे देखील सक्रीय झाल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, बाळासाहेब सानप यांनी देखील या निवडणुकीत आपले पॅनल उभे केले आहे. त्यामुळे चौरंगी लढत होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर देखील या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

Grampanchayat Election In Aurangabad District News
CM शिंदेंनी कार्यकर्त्यांना आवरावं; फडणवीसांना असं वागतांना कधी बघितले नाही : अजित पवार

तर दुसरीकडे शिवसेनेमुळे शिरसाट यांच्यांशी जोडला गेलेला मतदार त्यांच्या बंडानंतर कायम राहतो, की मग मुळ शिवसेनेसोबत जातो हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिंदे- भाजप राज्याच्या सरकारमध्ये सोबत असले तरी या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत हे विशेष. राज्यांतील बंडाळीनंतर जिल्ह्यातील बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसेनेचे स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत, त्यामुळे या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसतो का हे देखील निकालानंतर स्पष्ट होईल.

संजय शिरसाट हे सलग तीन टर्म आमदार असल्यापासून त्यांनी बजाजनगर-वडगाव कोल्हाटी या भागावर आपले लक्ष सातत्याने केंद्रित केले होते. या भागात त्यांनी विविध विकासकामे देखील केल्याचा दावा केला जातोय. आता त्यांनी पक्ष बदलल्यामुळे मतदार त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतात, की मग केलेल्या विकासकामांची पावती पुन्हा देतात यावर शिरसाट यांचे पुढील राजकारण अवंलबून राहणार आहे. चौरंगी लढत असल्याने ग्रामपंचायतीची सत्ता आणि सरंपच कोणाचा असेल याचा फैसला ४ तारखेला होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in