Mla Satish Chavan Reaction On Budget : हा तर विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प

Ncp : वेगाने आज घोषणा केल्या त्याच्या अमंलबजावणीत मात्र कासवगती दिसू नये ऐवढीच माफक अपेक्षा.
Mla Satish Chavan, News
Mla Satish Chavan, NewsSarkarnama

Marathwada : राज्याचे आर्थिक चित्र ऑल इज वेल नसून आव्हानांचा डोंगर उभे असल्याचे आज सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. (Budget Session) अर्थसंकल्पात सरकारने घोषणांचा नुसता पाऊस पाडला आहे, अशी टीका करत हा अभासी चित्र निर्माण करणारा अर्थसंकल्प असल्याचे मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी म्हटले आहे.

Mla Satish Chavan, News
Ambadas Danve News: वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, दानवेंनी उठवला होता आवाज !

राज्याची सद्यस्थिती, खर्च, उत्पन्न याचा कसलाही विचार करण्यात आलेला नाही असेही चव्हाण म्हणाले. (Ncp) सर्व सामान्य जनता, शेतकरी, नोकरदार वर्ग, उद्योजक, बेरोजगार, विद्यार्थी, महिला वर्ग आदींची या अर्थसंकल्पातून पूर्णपणे निराशा झाली आहे. (Maharashtra) हमीभाव मिळत नसल्याने कापुस, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काही ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा हेाती.

मात्र सर्व सामान्यांचे, शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे हे सरकार आहे असे म्हणणार्‍यांनी त्यांच्याच तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. महापुरूषांच्या नावाने फक्त मोठ्या घोषणा करण्यात आल्या पण त्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. सध्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे.

यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असे म्हटले असले तरी किती तरतूद केली हे सांगितले नाही. गतीमान म्हणवणार्‍या सरकारने ज्या वेगाने आज घोषणा केल्या त्याच्या अमंलबजावणीत मात्र कासवगती दिसू नये ऐवढीच माफक अपेक्षा असल्याचा टोला देखील चव्हाण यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com