MLA Santosh Danve News : आमदार संतोष दानवे मध्यप्रदेशात देतायेत संघटना बांधणीचे धडे...

Marathwada Political : संतोष दानवे हे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलेले आहेत.
MLA Santosh Danve News
MLA Santosh Danve NewsSarkarnama

BJP Political : भाजप कोणत्याही निवडणुका किती गांभीर्यपूर्वक लढवते हे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळेच अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेला देखील राज्याचे प्रमुख नेते जातात. (MLA Santosh Danve News) सध्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींची तयारी सुरू आहे. या सर्व राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

MLA Santosh Danve News
Latur Political News : लातूरमध्ये `मेडिकल टेक्नो झोन`, निर्माण करा ; अमित देशमुखांनी केली मागणी..

अगदी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची रणनिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आखली आहे. (Madhya Pradesh) त्यासाठी इतर राज्यातून आमदार, खासदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांना या राज्यांमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. (Jalna) जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे हे सध्या याच उपक्रमाअंतर्गत मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध मतदारसंघातील ग्रामीण भागात फिरून ते तरुण, महिला कार्यकर्त्यांना संघटना बांधणीसाठीचे धडे देतांना दिसत आहे.

दानवे (Santosh Danve) यांच्या भाषणाला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. नुकत्याच झालेल्या पांढुर्णा येथील महिला संमेलन आणि नादंनवाडी मंडळाची कॉर्नर बैठकीत दानवे यांनी मार्गदर्शन केले. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मध्यप्रदेश-२०२३ च्या पूर्वतयारी संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून सुरू असलेल्या विधायक प्रवास उपक्रमांतर्गत महिला संमेलन आणि नादंनवाडी मंडळाची कॉर्नर बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आगामी काळात महिलांची कामगिरी अधिक व्यापक कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नादंनवाडी परिसरातील पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आदी विषयांची माहिती दानवे देत आहेत. सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांचा दानवे यांच्या भाषणाला चांगलाच प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. संतोष दानवे हे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलेले आहेत.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव असलेले संतोष दानवे हे राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. वडिलांसारखी त्यांची भाषण शैली नसली तरी मध्यप्रदेशात त्यांच्या काॅर्नर बैठका, मेळाव्यांना गर्दी होत आहे. आता संतोष दानवे यांच्या अनुभवाचा मध्यप्रदेशातील कोणत्या मतदारसंघात आणि किती प्रभाव पडतो हे मतदानानंतरच्या निकालवरूनच स्पष्ट होईल. दानवे यांच्या मध्यप्रदेशातील बैठका, मेळावे आणि त्यातील भाषणांची इकडे त्यांच्या मतदारसंघात मात्र चर्चा होतांना दिसत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in