"लाईन तोडू नका, नाहीतर मी रट्टे द्यायला लावीन.." संतोष बांगरांची दमदाटी...

Santosh Bangar : यापुर्वी देखील बांगरांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.
MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
MLA Santosh Bangar, Hingoli Latest NewsSarkarnama

Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. त्यांनी दमदाटी केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे. (MLA Santosh Bangar, Hingoli Latest News)

MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
Belgaum Border Dispute : महाराष्ट्र- बेळगाव सीमावादाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे द्यायला लावीन, असा इशारा बांगरांनी (Santosh Bangar) दिला आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केल्याचे समजते.

MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
धोका वाढला!`स्वाइन फ्लू`नंतर आता गोवरसाठीही क्वॅारंटाईन सेंटर सुरु होण्याची शक्यता

बांगर हे अशाच काही गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत असतात. यापूर्वी देखील कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करतांना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगरांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच टीका केली होती. यावरून त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis) यांनी समज दिल्याचे बोलले जाते. मात्र मुळातच आक्रमक स्वभावाचे असलेल्या बांगरांनी पुन्हा एकदा असाच प्रकार पुन्हा केला आहे. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, या दमदाटी प्रकरणी कुठल्याही राजकीय नेत्यांनी सध्यातरी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in