संतोष बांगर निघाले सगळ्यांचेच गुरु; बंडखोरी करुनही आमदारकी वाचणार

Santosh Bangar | Shivsena : आदित्य ठाकरेंसोबत नोटीस न मिळालेले एकमेव आमदार
Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi, Shivsena Latest Marathi News
Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi, Shivsena Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील (Shiv Sena) १६ आमदारांच्या निलंबन नोटिसीवरील आणि इतर याचिका अद्याप प्रलंबित आहेत. पण त्यापूर्वीच विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस बजावली आहे. यात आदित्य ठाकरे आणि संतोष बांगर यांना वगळण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Shiv Sena | Eknath Shinde | Latest Marathi News)

विधिमंडळातील खरी शिवसेना नेमकी कोणती, प्रतोद, गटनेता कोण हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपद निवडणूक आणि बहुमत चाचणी या दोन्हीवेळी शिंदे गट व शिवसेनेने एकमेकांविरोधात व्हीप काढले होते. आता दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.(Shivsena Latest Marathi News)

Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi, Shivsena Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुण्यात शिवसेनेला खिंडार ; साळी, भोसले देणार राजीनामा

शिंदे गटाने कारवाईची मागणी केलेल्या यादीतून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळले

शिंदे गटाने कारवाईची मागणी केलेल्या यादीतून आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षीय निवडणूक आणि बहुमत चाचणी या दोन्हीसाठी व्हीप काढला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे आणि बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते. पण या आमदारांनी नार्वेकर आणि सरकारच्या विरोधात मतदान केल्याने त्यांची तक्रार करण्यात आली. यातून आदित्य यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही महाविकास आघाडीला मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. पण शिंदे गटाकडून त्याचे पालन न करण्यात आल्याने चाळीस आमदारांविरोधात तक्रार करण्यात आली होती. विधिमंडळ सचिवांनी या दोन्ही तक्रारींची दखल घेतली असून त्यानुसार दोन्ही बाजुकडील आमदारांना नोटीस बजावली आहे. सोबतच पुढील सात दिवसांत बाजू मांडण्यास सांगितले आहे. आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे आदित्य यांना नोटीस पाठवली नसल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही गोगावले म्हणाले.

Santosh Bangar News in Marathi, Hingoli News in Marathi, Shivsena Latest Marathi News
मुंबईत परतल्यावर दोघे चर्चा करु पण आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित : एकनाथ शिंदे

संतोष बांगर निघाले सगळ्यांचेच गुरु :

दरम्यान विधिमंडळ सचिवांकडून संतोष बांगर यांनाही नोटीस बजावलेली नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष निवडणुकीवेळी बंगार शिवसेनेच्या गटात होते. त्यांनी अध्यक्षपदासाठी उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी मतदान केले होते. त्यामुळे शिवसनेच्या गटाने दिलेल्या नोटिशीत त्यांचे नाव नव्हते. तर दुसऱ्या दिवशी सरकारवरील विश्वास प्रस्तावाच्या वेळी बांगर हे बंडखोर गटार सामील झाले होते. त्यामुळे बंडखोर गटाने त्यांना नोटीस दिली नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या सर्व आमदारांवर या ना त्या गटाची नोटीस आहे, मात्र बांगर यातून बचावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com