Mla Santosh Bangar News : माझ्यावरचा गुन्हा खोटा, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला पायाखाली तुडवू..

Marathwada : हा प्रचार्य लिंगपिसाट आहे, कोल्हापूर, साकोल्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
MLA Santosh Bangar, Hingoli Latest NewsSarkarnama

Hingoli : हिंगोली येथील प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दहा दिवसांपुर्वी घडलेल्या प्रकाराची तक्रार आणि त्यावर गुन्हा आज दाखल होतो. याचाच अर्थ विरोधकांनी त्या प्राचार्याला तक्रार द्यायला भाग पाडलं आणि माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला. पण माझ्या मायभगिनीची अब्रु चव्हाट्यावर येवू नये, म्हणून मी शांत बसलो होतो.

MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
Mla Santosh Danve News : सकाळी मफलर, दुपारी ब्लेझर, संध्याकाळी फाॅर्मल; दानवेंच्या लूकची चर्चा..

माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला फरक पडत नाही, पण त्या लिंगपिसाट प्राचार्याला आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार बांगर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला. (Hingoli) संबंधित प्राचार्य हा लिंगपिसाट आहे, कोल्हापूर, साकोला येथे त्यांच्यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हा दाखल (Fir Filed) असल्याचा दावा देखील बांगर यांनी केला.

नुकताच संतोष बांगर यांचा हिंगोलीतील एका प्राचार्याला महाविद्यालयात जावून मारहाण करतांना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणी आमदार बांगर यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबद्दल बोलतांना बांगर यांनी संबंधित प्राचार्याला धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा, इशारा दिला.

बांगर म्हणाले, दहा दिवसानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधकांचा यामागे हात असला तरी मला त्याने काही फरक पडत नाही. त्या प्राचार्याच्या विरोधातच अन्याय झालेली महिला, भगिनी गुन्हा पोलिसांत तक्रार दाखल करणार होती. पण अब्रू चव्हाट्यावर येवू नये म्हणून आम्ही थांबलो होतो. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महाविद्यालयातीन अनेक महिला, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे मला फोन आले.

त्या सगळ्यांनी दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रचार्य लिंगपिसाट आहे, कोल्हापूर, साकोल्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तब्बल १३ वेळा बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे दाखवत असतांना त्या प्राचार्याचे कारनामे देखील तपासा, पोलिस चौकशीत ते समोर येईलच. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी महिला, भगिनीवर कुणी अत्याचार करत असेल तर त्याला पायाखाली तुडवल्याशिवाय हा बांगर स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील बांगर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in